बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा व अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी ते दोघेही विवाहबंधनात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आता मलायकाकडे गुड न्यूज असून ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, मलायका गरोदर असून अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. मलायका व अर्जुन ऑक्टोबर महिन्यात लंडन ट्रिपला गेले होते. तेव्हाच त्यांनी ही गुड न्यूज त्यांच्या नातेवाईकांना दिली असल्याची माहिती पिंकविलाने दिली आहे. त्यामुळे मलायका आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

हेही वाचा >> Video: भर पार्टीत ‘दिल ले गयी’ गाण्यावर बेभान होऊन नाचली करिश्मा कपूर, उपस्थितही तिच्याकडेच बघत राहिले अन्…

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

दरम्यान, अर्जुन कपूर किंवा मलायका अरोरा यांनी याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मलायकाने १९९८ मध्ये अरबाज खानशी लग्नगाठ बांधली होती. २०१७मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. मलायका ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा शो मलायकाच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर आधारित असणार आहे. या शोमध्ये अर्जुन कपूर व अरबाज खानही झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is malaika arora pregnant arjun kapoor to be a father kak