सलमान खान एका मोठ्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. तब्बल ३ वर्षांनी सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडला आहे तर गाणीदेखील सुपरहीट आहेत. सलमानच्या या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे.

तुम्ही सलमान खानच्या हातातील टरक्वाइज अर्थात फिरोजा कलरचे ब्रेसलेट पाहिलं असेलच. या ब्रेसलेटशिवाय सलमान क्वचितच इतर कोणतीही ऍक्सेसरी परिधान केलेला दिसतो. हा त्याचा लकी चार्म आहे. पण गेले काही दिवस सलमानच्या दुसऱ्या हातात एक घडयाळ आपल्याला बघायला मिळत आहे. सलमानने डिसेंबर २०२२ मध्ये आपल्या ५७ व्या वाढदिवसापासून हे घड्याळ घालण्यास सुरुवात केली आहे. सलमानने यापूर्वी कधीही हे घड्याळ घातलेले दिसले नव्हते. आता मात्र प्रत्येक कार्यक्रमात, सगळीकडे सलमानच्या हातात हे घडयाळ बघायला मिळत आहे.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

आणखी वाचा : सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; अवघ्या काही तासांतच बुकिंग फूल

सलमानचं या घड्याळाशी काय आहे खास कनेक्शन?

या घड्याळाची विशेष गोष्ट म्हणजे याचा रंगही त्यांच्या ब्रेसलेटसारखाच आहे. सलमान लहान असताना वडिलांच्या ब्रेसलेटबरोबर खेळायचा. तो मोठा झाल्यावर वडील सलीम खान यांनी त्याला तेच ब्रेसलेट दिले जे अभिनेता नेहमी घालतो. या ब्रेसलेटमध्ये नीलमणी खडा आहे. तेव्हापासून सलमान या ब्रेसलेटला लकी चार्म मानतो. आता त्याने अशाच प्रकारचे घडयाळही घालयला सुरुवात केल्याने हा सलमानचा नवा लकी चार्म असल्याची चर्चा होत आहे. बाबा सिद्दीकीने दिलेली इफ्तार पार्टी, चित्रपटांचे ट्रेलर लॉंच, फिल्मफेअरसाठी ठेवलेली प्रेस मीटिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी सलमानच्या हातातले हे घडयाळ लोकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहे.

salmankhanwatch
salmankhanwatch

या घड्याळाची किंमत काय?

हे कोणतंही सामान्य घडयाळ नाही, तर एक लक्झरी घडयाळ आहे. या घड्याळाचा डायल टर्कॉइज रंगाचा असून तो १८ कॅरेट पिवळ्या सोन्याचा बेझल सेट हिऱ्यांसह बनलेला आहे. म्हणजेच या घड्याळात सोन्याबरोबरच किंमती हिरेही जडलेले आहेत. या घड्याळाची किंमत ऐकून लोकांची शुद्ध हरपेल. या रोलेक्स घड्याळाची किंमत सुमारे ४६.८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश, भूमिका चावला, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, विजेंदर सिंग, पलक तिवारी आणि जस्सी गिल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सलमानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट हे ईदच्याच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. आता यंदा ईदच्या निमित्ताने पुन्हा बॉस ऑफिसवर सलमान खान राज्य करणार का ते लवकरच समोर येईल.

Story img Loader