टायगर श्रॉफ ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या त्याचा आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर आणि अक्षयने या चित्रपटाचं प्रमोशन वेगवेगळ्या शहरांत जाऊन अनोख्या पद्धतीनं केलंय.टायगरला त्याचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडतं. अनेकदा टायगर आणि दिशाच्या रिलेशनबद्दल अफवा पसरल्या आहेत. परंतु, या विषयावर टायगरनं नेहमीच बोलायचं टाळलं आहे. एका मुलाखतीत त्यानं दिशाचा उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकत्याच ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा टायगरला विचारण्यात आलं की, तू सिंगल आहेस का? तुझं आयुष्य कोणत्या दिशेला जातंय? त्यावर टायगरनं मजेशीर उत्तर दिलं. अभिनेता म्हणाला, “माझ्या आयुष्यात एकच दिशा आहे. हो आणि ते आहे माझं काम.”

हेही वाचा… ज्या घरात ५०० रुपये भाड्याने राहायचा अक्षय कुमार, आता तेच विकत घेणार; बालपणीची आठवण सांगत म्हणाला…

दिशाबद्दलचा शब्दांचा हा खेळ ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ट्रेलर लॉंचपासून सुरू झाला. जेव्हा अक्षय कुमारला विचारण्यात आलं होतं की, तो टायगरला काय सल्ला देऊ इच्छितो? तेव्हा अक्षय म्हणाला होता, “मी टायगरला एवढंच सांगेन की एकाच दिशेवर लक्ष केंद्रित कर.” अक्षयच्या या वक्तव्याने सर्वत्र हशा पिकवला.

टायगर श्रॉफ आणि ‘दिशा पाटनी यांनी ‘बेफिकरा’, ‘बाघी-२’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करीत असल्याच्या अफवा सुरू झाल्या. २०२३ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालाय अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. परंतु, या दोन्ही गोष्टींवर टायगर किंवा दिशानं अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

हेही वाचा… बॉक्स ऑफिसच्या अपयशासाठी महिला जबाबदार? क्रिती सेनॉन स्पष्टच म्हणाली, “… दोष मुलींना देतात”

दरम्यान, टायगर श्रॉफच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर जगन शक्ती यांच्या आगामी चित्रपटात टायगर झळकणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात टायगर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. टायगरचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. मानुषी छिल्लर, अलाया फर्निचरवाला, पृथ्वीराज सुकुमारन, रोनित रॉय यांच्याही निर्णायक भूमिका यात आहेत.