Isha Koppikar Timmy Narang Divorce: अभिनेत्री ईशा कोप्पीकर व हॉटेल व्यावसायिक टिमी नारंग यांचा नोव्हेंबर २०२३ मध्ये घटस्फोट झाला. १४ वर्षांच्या संसारानंतर दोघेही विभक्त झाले. या जोडप्याला १० वर्षांची मुलगी रियाना आहे. ईशाच्या घटस्फोटाला एक वर्ष झालंय आणि हे वर्ष खूप कठीण होतं, असं तिने म्हटलंय. पहिल्यांदाच ईशाने घटस्फोट, त्यानंतरची नवीन सुरुवात आणि आयुष्यात पुढे जाण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. टिमीला घटस्फोट हवा होता, असं ईशाने सांगितलं.
ईशा म्हणाली, “त्याला घटस्फोट न देणं माझ्यासाठी सोपं होतं, पण ते माझ्या तत्वांच्या विरोधात असतं. आम्ही सहमतीने वेगळे झालो. घटस्फोट माझ्यासाठी खूप कठीण होता. मला काही उत्तरं हवी होती जी मिळाली. मी खूप अध्यात्मिक आहे. एकत्र राहून भांडणं करण्यात काय अर्थ आहे? कोणतीही गोष्ट स्थिर झाली की त्यातून दुर्गंधी येऊ लागते, अगदी पाण्यालाही वास येऊ लागतो. आणि मला वाटतं की आयुष्य स्वतंत्रपणे जगणं आहे.”
हेही वाचा – घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
ईशाने टिमी नारंगच्या घराजवळ विकत घेतलं घर
घटस्फोटानंतर ईशा मुलीला घेऊन टिमीच्या मुंबईतील पाली हिल भागातील ‘नारंग हाऊस’मधून बाहेर पडली. हा एक आव्हानात्मक टप्पा होता, कारण तिला ते घर सोडण्याचं कारण तिच्या मुलीला समजावून सांगायचं होतं. मुलीला योग्य पद्धतीने सांगितलं आणि आता टिमी व ईशा लेकीचे सह-पालक आहेत. “मी नारंग हाऊसजवळ एक घर विकत घेतलंय, जेणेकरून माझी मुलगी तिचे वडील आणि चुलत भावंडांच्या जवळ राहू शकेल. आम्ही पती-पत्नी म्हणून पुढे गेलो असू, पण आम्ही आमच्या मुलीसाठी पालक म्हणून एकत्र आहोत आणि ते कधीही बदलणार नाही,” असं ईशा ती म्हणाली.
हेही वाचा – घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
घटस्फोटानंतर टिमीबरोबर मैत्रीचं नातं
घटस्फोटानंतर ईशा व टिमीचं नातं सुधारलं आहे. ती व टिमी आता मित्र झाले आहेत. “मला वाटतं की जेव्हा तुम्ही एकमेकांकडून काहीही अपेक्षा करत नाही तेव्हा नाती सुधारतात”, असं ईशा म्हणाली. घटस्फोटानंतर तिला फार भीती वाटत होती. आयुष्य नव्याने कसं सुरू करावं हे माहीत नव्हतं. मुलगी एका विशिष्ट वातावरणात वाढली होती, त्यामुळे तिला वाढवताना त्या सगळ्या सुविधा कशा देईन ही भीती होती, मात्र तरीही विश्वासाने या परिस्थितीतून पुढे गेल्याचं ईशाने सांगितलं.
हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर
नेमकं काय चुकलं, हे सांगणं कठीण – ईशा
नेमकं काय चुकलं ज्यामुळे घटस्फोट झाला, हे सांगणं कठीण आहे; मात्र घटस्फोट घेण्याचा निर्णय टिमी नारंगचा होता, असं ईशाने स्पष्ट केलं. टिमीने जेव्हा घटस्फोटाची घोषणा केली, त्यावेळी ईशा यासाठी तयार नव्हती. रियाना यावर कशी प्रतिक्रिया देईल याची तिला काळजी वाटत होती. “ही त्याने अत्यंत बेजबाबदारपणे केलेली कृती होती, कारण मला वाटत होतं की रियानाने ही परिस्थिती हळूहळू स्वीकारावी. मला याविषयी तिच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायचं होतं, पण त्याआधी त्याने जगाला सांगितलं. मात्र, नंतर त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने माफीही मागितली,” असं ईशा म्हणाली. ईशा कोप्पिकरने आता पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रित करत असल्याची माहितीही दिली.