२००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली. मध्यंतरी शाहरुख खान या ‘डॉन ३’मध्ये दिसणार नसल्याची बातमी समोर आली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे.

‘डॉन ३’मध्ये शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंहची वर्णी लागली आहे. नुकताच फरहानने रणवीरचा ‘डॉन ३’मधला फर्स्ट लूकही शेअर केला. सोशल मीडियावर मात्र ही बातमी ऐकून शाहरुखचे चाहते आणि ‘डॉन’ सीरिजचे फॅन्स मात्र नाराज झाले आहेत. तर याच ‘डॉन’च्या पहिल्या भागात शाहरुखसह काम करणारी अभिनेत्री ईशा कोपिकरने मात्र रणवीर सिंहची निवड योग्य असल्याचं वक्तव्य केलं आहे.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
ap dhillon diljit dosanjh dispute
दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”

आणखी वाचा : ‘डॉन ३’चा फर्स्ट लूक समोर, रणवीर सिंह दिसणार मुख्य भूमिकेत; नेटकरी म्हणाले, “शाहरुख…”

‘इंडिया टूडे’शी संवाद साधताना ईशा म्हणाली, “डॉन ही सीरिज जेव्हा सुरू झाली, तेव्हापासून यात सतत बदल होत गेले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ही भूमिका अजरामर केली, त्यानंतर शाहरुख खानने त्याचा खास चार्म या भूमिकेत आणला आणि आता रणवीर सिंह यासाठी सज्ज आहे. रणवीर विविध भूमिका अगदी लीलया पेलतो हे आपण अनुभवलं आहेच. त्यामुळे ‘डॉन’ची ही लेगसी पुढे घेऊन जाण्यासाठी रणवीर सिंहला घेणं ही अत्यंत योग्य निवड आहे. त्याचा करीज्मा आणि स्टाइल पाहता तो या भूमिकेसाठीच बनला आहे हे सत्य आहे.”

‘डॉन ३’च्या या नव्या टीझरखालील कॉमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी रणवीरची खिल्ली उडवली आहे. तसेच शाहरुख नसेल तर डॉन ३ पाहणार नाही असंही काही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. एकूणच जे प्रेक्षक शाहरुखच्या ‘डॉन ३’ची आतुरतेने वाट पहात होते त्यांचा हा टीझर पाहून हिरमोड झाला आहे. अद्याप चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द फरहान अख्तर याचं दिग्दर्शन करणार आहे.

Story img Loader