बॉलिवूड अभिनेता इशान खट्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भाऊ शाहिद कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात उतरलेल्या इशानचा ‘फोन भूत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यात त्याच्याबरोबर अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी इशानने त्याच्या कुटुंबियांबद्दल खासकरून त्याची वहिनी मीरा राजपूतबाबत मोठा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इशान खट्टरने त्याच्या कुटुंबियांबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. इशानने सांगितलं की त्याची वहिनी म्हणजेच शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत घरातील सर्वाधिक तक्रार करणारी व्यक्ती आहे. पण त्यासोबतच ती खूप प्रेमळ असल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

आणखी वाचा- शाहिद कपूरचा कुटुंबियांसह वरळीच्या घरामध्ये गृहप्रवेश, इतक्या कोटी रुपयांना खरेदी केलं अलिशान घर

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत इशान खट्टर म्हणाला, “माझी वहिनी मीरा राजपूत घरात सर्वात जास्त तक्रार करत असते. ती नेहमीच, तू शूज इथे फेकलेस, तू केलं नाही नाहीयेस, तू ते केलं नाहीयेस अशा तक्रारी करत असते. तिच्याकडून मला अनेकदा अशा गोष्टींवरून ऐकून घ्यावं लागतं. पण तिचा हाच अंदाज मला खूप आवडतो. कोणत्याही सरप्राइज पार्टीज प्लान करण्यात मीरा खूप बेस्ट आहे. हे सगळं करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. तिच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्यामुळे घरी असताना मी तिच्यासोबत बराच वेळ व्यतित करतो. तिच्याकडे आयुर्वेद, खाणं आणि कल्चर या सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आहे.”

आणखी वाचा- “बाथरुममधून बाहेर पडेपर्यंत तरी…” शाहिद कपूरनं इन्स्टाग्रामवर उडवली पत्नी मीरा राजपूतची खिल्ली

दरम्यान इशान खट्टरच्या वाढदिवशी मीरा राजपूतने एक प्रेमळ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मीराने इशानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घरातील सर्वात आवडता व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय इशान आणि शाहिद या दोन्ही भावांमध्येही खूप खास बॉन्डिंग असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. दोघंही कुटुंबियांसह सण साजरे करताना दिसतात. सोशल मीडियावरही इशान अनेकदा मीरा आणि शाहिद यांच्याबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो.

Story img Loader