बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी जोडपी अत्यंत लोकप्रिय आहेत. कतरिना कैफ-विकी कौशल, कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख-डिसूझा-देशमुख अशा काही जोडप्यांमध्ये आलिया भट्ट(Alia Bhatt) व रणबीर कपूर(Ranbir Kapoor) या जोडीचादेखील समावेश आहे. रणबीर व आलिया हे सध्या त्यांच्या व्यावसायिक जीवनात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. एक यशस्वी जोडपे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. व्यावसायिक जीवनाबरोबरच ही जोडी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्य चर्चेत असतात. या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. आता मात्र अभिनेता रणबीर कपूरने एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने नुकतीच ‘माशाबल इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रणबीर कपूरने त्याच्या एका चाहतीचा किस्सा सांगितला. रणबीर म्हणाला, “माझ्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस होते. एक मुलगी होती. मी तिला कधीही भेटलो नाही; पण माझ्या वॉचमॅनने मला सांगितले की, एक मुलगी एका पंडितजींना घेऊन आली. तिने गेटबरोबर लग्नाचे विधी केले. ज्या बंगल्यात मी माझ्या आई-वडिलांसह राहत होतो, त्या गेटवर टिळा लावलेला होता. फुले पडलेली होती. मला वाटतं की, मी त्यावेळी शहराबाहेर होतो. मला वाटतं तो वेडेपणा होता.” पुढे अभिनेता गमतीत म्हणाला, “आतापर्यंत मी माझ्या पहिल्या पत्नीला भेटलो नाही. कुठेतरी भेट होईल, अशी आशा आहे.”

रणबीर कपूरने आलिया भट्टबरोबर एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांना राहा ही मुलगी आहे. राहा अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. आलिया भट्ट रणबीर कपूर अनेकदा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात. आलियाने याआधी एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणबीर तिला तिच्यासाठी योग्य आहे, असे वाटणारा क्षण कोणता होता, यावर वक्तव्य केले होते. “तो खूप साधा आहे. एक अभिनेता, एक व्यक्ती म्हणून तो खूप चांगला आहे. तो उत्तम माणूस आहे”, असे म्हणत आलियाने त्याचे कौतुक केले होते.

रणबीर व आलिया यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आलिया-रणबीर याआधी ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र दिसले होते. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader