‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता इम्रान खानच्या प्रेमात त्यावेळी कोणी पडलं नसेल. गोड, निरागस, गुडबॉय अशी प्रतिमा असलेल्या जय या पात्राने सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर ‘आय हेट लव स्टोरीज’, ‘दिल्ली बेली’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘एक मैं और एक तू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली. परंतु हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत.

यानंतर इम्रान खान हा लाईमलाइटपासून बराच दूर गेला. चित्रपटातही काम करणं त्याने बंद केलं. त्यानंतर काही ठिकाणी आमिर खानबरोबरच्या आणि कुटुंबाबरोबरच्या काही फोटोज आणि व्हिडीओजमध्ये तो दिसला पण तेवढ्यापुरताच. आता मात्र इम्रान खान कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान इम्रानने हजेरी लावली तेव्हा त्याने यावर भाष्य केलं.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

आणखी वाचा : राही अनिल बर्वे: भीतीने वाचा फुटलेला मुलगा ते ‘तुंबाड’द्वारे सिनेमाची भाषा बदलणारा दिग्दर्शक

इम्रान पुन्हा चित्रपटात येणार का याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्याकडे आत्ता या प्रश्नाचं ठोस असं उत्तर नाही, पण हो सध्या मी काही कथा वाचतो आहे, याबरोबरच काही निर्माते आणि दिग्दर्शकांशीही चर्चा सुरू आहेत. आशा करूया पुढील वर्षी नक्की कमबॅक करायला मिळेल.” इम्रानच्या या वक्तव्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर त्याच्या कमबॅकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांनी याआधीही कमबॅक करावा अशी विनंती बऱ्याचदा केलेली. एका चाहतीने तर कॉमेंट करत लिहिलं होतं की “आता झीनत अमान यांनीसुद्धा कमबॅक केलं, तू कधी करणार?” यावर इम्रानने तेवढ्यापुरतं उत्तर दिलं, पण बरेच लोक आहेत जे इम्रानच्या कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत. आता त्याच्या या नव्या वक्तव्यामुळे तर त्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Story img Loader