Jaat Public Review : सनी देओल ‘गदर २’नंतर पुन्हा एकदा ‘जाट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘जाट’ आज (१० एप्रिल) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट जोरदार ओपनिंग करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे.
‘जाट’च्या निर्मितीसाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हैदराबाद, बापटला आणि विशाखापट्टणममध्ये ‘जाट’चे शूटिंग करण्यात आले आहे. ‘जाट’ आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित असलेल्या लोकांनी आणि ‘जाट’ सकाळचे शो पाहिलेत, त्यांनी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जाट’चा पब्लिक रिव्ह्यू पाहुयात.
चाहत्यांनी सनीच्या सिनेमाला दाक्षिणात्य मसाला ॲक्शन एंटरटेनर चित्रपट म्हटलं आहे. “पहिला हाफ ॲक्शन आणि इमोशन्सने भरलेला आहे, तर दुसरा हाफ एक्साइटमेंटने भरलेला आहे. यात भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट ॲक्शन सीक्वेन्स आहे, तसेच हा चित्रपट भावनिकही आहे,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.
पाहा पोस्ट-

जाट चित्रपट तुमच्या कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर पाहा आणि नंतर मला थँक्यू म्हणा. आजी-आजोबा, आई-बाबा, तुमची मुलं सर्वांनाच हा चित्रपट पाहायला आवडेल. जाट चुकवू नका. हा ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
“ब्लॉकबस्टर… सनी देओलचा जाट पाहायलाच हवा. तो १००% स्क्रीन प्रेझेन्ससह परत आला आहे.. संवाद, अॅक्शन आणि कथा.. सगळंच बेस्ट आहे,” असं एका युजरने लिहिलंय.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी जाटला थ्री स्टार रेटिंग दिले असून सनी देओलसह दिग्दर्शकाचं कौतुक केलं आहे.
एका युजरने जाटला पैसा वसूल चित्रपट म्हटलं आहे.
“फर्स्ट हाफ उत्तम, ८०-९० च्या दशकातील सनी देओल ॲक्शन अवतारात परत आला आहे. कथेनुसार उत्तम पटकथा, पार्श्वसंगीत उत्तम, अंगावर शहारे आले,” अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
जाट चित्रपट उत्तम आहे, गाणी आणखी चांगली असू शकली असती, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.