बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या डेटिंगच्या चर्चा नेहमीच रंगताना दिसतात. अनेक कलाकारांच्या तर विवाहबाह्य संबंधांबद्दलही चर्चा रंगत असतात. अभिनेते जॅकी श्रॉफ यांचं नाव नेहमीच अशा चर्चांपासून दूर राहिलं. त्यांनी त्यांची पत्नी सोडून कधीही दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार केला नाही. आता जॅकी श्रॉफ यांनी याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

अभिनेते जॅकी श्रॉफ गेली अनेक वर्ष त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आले आहेत. त्यांच्या कामाबरोबरच ते त्यांच्या साधेपणामुळे देखील चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत मीनाक्षी शेषाद्री, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, जुही चावला अशा विविध आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केलं. पण आजपर्यंत त्यांचं नाव कधीही कोणत्या अभिनेत्री बरोबर जोडलं गेलं नाही. याबद्दल नुकताच एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेत खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “घर गहाण ठेवलं, जमिनीवर झोपण्याची वेळ…” जॅकी श्रॉफ यांची पत्नी भावूक

‘वेव्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, “तुमचं नाव कधीही कोणत्याही अभिनेत्री बरोबर जोडला गेलं नाही. पण तुमच्या पत्नीने कधी तुमच्यावर संशय घेतला का?” यावर उत्तर देत जॅकी श्रॉफ म्हणाले, “ती मला खूप चांगली ओळखते. मी इतकी वर्ष इंडस्ट्रीतील उत्तमोत्तम अभिनेत्रींबरोबर काम करत आहे. पण आयशाने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. कधी कधी शूटिंगनिमित्त उटी, काश्मीरमध्ये असलो तरी तिने मला कधीच काही विचारलं नाही किंवा मी कुठे आहे हे तपासण्यासाठी तिने कधीही फोन केला नाही. तिला माहीत आहे की मी कामानिमित्त बाहेर गेलो आहे आणि घरी परतणार आहे.”

हेही वाचा : टायगर श्रॉफचं खरं नाव माहित आहे का? ‘या’ कारणाने केला होता नावात बदल

पुढे ते म्हणाले, “मी आतापर्यंत ज्या अभिनेत्रींबरोबर काम केलं त्या सर्वांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. आजही आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा भरपूर गप्पा मारतो. माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते आणि मी तिच्यावर प्रेम करतो. मी तिचा खूप आदर करतो.”

Story img Loader