अभिनेते जॅकी श्रॉफ व त्यांची पत्नी आयशा यांनी एकमेकांशी लग्न करण्यापूर्वी डेट केलं होतं. डेटिंगनंतर दोघांनी ५ जून १९८७ रोजी आयशाच्या वाढदिवशी लग्न केलं होतं. पण, त्यांच्या नात्यासाठी आयशाच्या आईची मंजुरी नव्हती. त्याचं कारण होतं जॅकीची ‘जग्गू दादा’ अशी सार्वजनिक प्रतिमा आणि त्यांच्याबद्दल ऐकलेल्या वाईट गोष्टी. आता जवळपास ३६ वर्षांच्या संसारानंतर जॅकी श्रॉफ म्हणाले की मी तिच्या आईच्या जागी असतो, तर तिला माझ्याशी लग्न करू दिलं नसतं.
“त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन
लग्न करण्यासाठी प्रेम पुरेसे नाही, तर पुरुषानेही स्त्रीची जबाबदारी घ्यायला हवी, असं मत जॅकी श्रॉफ यांनी मांडलं. “जर मी आयशाची आई असतो, तर मी तिला माझ्याशी लग्न करू दिले नसते. पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी काम करा आणि आपल्या पत्नीची, मुलांची काळजी घेता येईल, वैद्यकीय खर्च व घरभाडे भरता येईल इतकं कमवा. लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्याकडे पुरेसे पैसे असले पाहिजेत, ”असं ते ‘झूम एंटरटेनमेंट’शी बोलताना म्हणाले.
कंगना रणौतने शेअर केला सलमान खानबरोबरचा जुना व्हिडीओ, म्हणाली, “SK आपण इतके…”
लग्नासाठी उत्साही असणाऱ्या लोकांबाबतही त्यांनी भाष्य केलं. “काही लोकांना प्रेम असलं की लग्न करायचं असतं. पण, आधी तरी विचार करा की लग्नानंतर काय होणार आहे. तुम्हाला होणाऱ्या पत्नीची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे या दृष्टीकोनातून विचार केला तर आयशाची आई बरोबर होती,” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
एका मुलाखतीत आयशानेही याबद्दल सांगितलं होतं. “जेव्हा मी माझ्या पतीला डेट करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आईचा त्यासाठी नकार होता. कारण जॅकी ‘जग्गू दादा’ सारखा होता. आजुबाजुला कान भरणारे लोक होते, त्यांनी जॅकी वाईट मुलगा आहे, असं घरी सांगितलं. आईचा विरोध असूनही मी तिला लपून भेटायचे. अखेर एके दिवशी मी माझ्या आईला सांगितलं की आई, तो कदाचित जगातील सर्वात श्रीमंत माणूस नसेल, परंतु तो सर्वात चांगल्या मनाचा माणूस आहे आणि तो मला आनंदी ठेवेल.’ त्यावर ‘तू चाळीत कशी राहशील?’ असा प्रश्न आयशाच्या आईने विचारला होता.
“लग्नानंतरच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले पण आयशाने तिचा माझ्यावर असलेला विश्वास कायम ठेवला. यामुळेच मी खूप गोष्टी करू शकलो,” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.