जॅकी श्रॉफ व अनिल कपूर यांचा ‘परिंदा’ चित्रपट आजही तुम्हाला आठवत असेल. १९८९मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अगदी उत्तम प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने अनेक नावाजलेले पुरस्कारही पटकावले. ‘परिंदा’ला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या चित्रपटासाठी जॅकी व अनिल यांनी खूप मेहनत घेतली होती. याचबाबत जॅकी यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.
‘यारों की बारात’ या शोमध्ये जॅकी यांनी या चित्रपटाबाबत एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, “परिंदा’साठी मला पुरस्कार मिळणार हे मला माहित नव्हतं. पुरस्कार सोहळ्यादरम्यान टायगरच्या आईने त्याला माझ्या मांडीवर दिलं. टायगर माझ्या मांडीवर झोपला होता. पण अचानक माझं नाव घोषित करण्यात आलं. मी माझं नाव ऐकून भारावून गेलो. टायगरला घेऊनच मी मंचावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो”.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
या चित्रपटामध्ये जॅकी यांनी अनिल कपूर यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. परिंदा’ला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर जॅकी यांनी एका गोष्टीचा खुलासा केला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा जॅकी यांनी सांगितला. परिंदा’च्या एका सीनसाठी जॅकी यांनी अनिल यांना १७ वेळा कानाखाली मारली होती.
आणखी वाचा – Video : महेश मांजरेकरांच्या लेकाचं हॉटेल पाहिलंत का? ‘या’ खास पदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार
ते म्हणाले, “मला एका सीनमध्ये अनिलला कानाखाली मारायची होती. या सीनसाठी पहिला शॉट दिला. पहिलाच शॉटला दिग्दर्शकाने ओके असं म्हटलं. पण त्यांना हा सीन अजून चांगल्या पद्धतीने हवा होता. मी त्याला पुन्हा कानाखाली मारली. दरम्यान मी जवळपास १७ वेळा अनिलला खानाखाली मारली होती. कानाखाली मारण्याचं निव्वळ नाटकही करणं मला शक्य नव्हतं. कारण तसेच हावभाव अनिलच्या चेहऱ्यावर दिसले नसते”.