बॉलीवूड अभिनेता व चित्रपट निर्माता जॅकी भगनानी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगशी लग्न करणार आहे. दोघेही २१ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकतील. या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. दोघेही गोव्यात लग्न करणार आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण जॅकी भगनानीचं रितेश देशमुखच्या कुटुंबाशी खास नातं आहे.

जॅकी भगनानी हा सुप्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी व पूजा भगनानी यांचा मुलगा आहे. जॅकीला एक मोठी बहीण आहे. ही बहीण देशमुख कुटुंबाची सून आहे. जॅकी भगनानीची बहीण दीपशिखा ही लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांची पत्नी आहे. जॅकी व दीपशिखा हे दोघेही सख्खे बहीण-भाऊ आहेत. रकुल प्रित सिंग ही दीपशिखा देखमुखची वहिनी होणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos

जॅकी व दीपशिखा अनेक वेळा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात. दीपशिखा व धिरज यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त जॅकी अनेकदा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. दीपशिखादेखील चित्रपट निर्माती आहे. दीपशिखा व धिरज यांचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

दरम्यान, जॅकी व रकुल प्रीतबद्दल बोलायचं झाल्यास ते मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी आधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही गोव्यात २१ फेब्रुवारी रोजी लग्न करतील. त्यांच्या लग्नानिमित्त दोघांच्याही घरी सजावटीचं काम सुरू आहे.

Story img Loader