गोविंदा आणि करिष्मा कपूर यांचा ‘हिरो नं १’ हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. आता या चित्रपटाने २५ वर्ष पूर्ण केली आहेत. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकेच नाही, तर या चित्रपटात कोणकोण कलाकार दिसतील हेही समोर आले आहे.
आणखी वाचा : परदेशात जाऊनही जपली भारतीय संस्कृती!; शहनाज गिलच्या ‘त्या’ कृतीचे होतेय कौतुक
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हिरो नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक तयार करण्याचे काम सुरु आहे. हा चित्रपट अॅक्शन पॅक फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकी भगनानी आणि जगन शक्ती यांना एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट बनवायचा आहे. या चित्रपटाचे नाव ‘हिरो नंबर १’ असे असेल या चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती करणार असून या चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी करणार आहेत.
निर्मात्यांना या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करायचे आहे. परदेशाताही या चित्रपटाचे शूटिंग केले जाईल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे अभिनेता टायगर श्रॉफ. या चित्रपटाच्या शूटिंगला २०२३ सुरुवात होईल असे बोलले जात आहे. सध्या या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचं काम सुरु आहे. तर लवकरच या चित्रपटातील इतर कलाकारांचीही माहिती समोर येणार आहे.
हेही वाचा : हिरोपंती २ फ्लॉप झाल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर…”
टायगर श्रॉफ शेवटचा अॅक्शन पॅक्ड चित्रपट ‘हिरोपंती २’ मध्ये दिसला होता. त्यानंतर त्याच्या आगामी चित्रपटांची यादी हळूहळू वाढत चालली आहे. ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ अभिनेत्री क्रिती सेनॉन जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर ‘गणपत’ हा चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांना टक्कर देताना दिसणार आहे. याशिवाय टायगर अक्षय कुमारसोबत ‘पेंच ढीला’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे. तसेच आता त्याची ‘हिरो नंबर १’मध्येही एंट्री झाल्यामुळे त्याचे चाहते खुश असल्याचे दिसत आहेत.