अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जॅकलिनने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांचा विचार करून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने राहत्या घराच्या परिसरात जागोजागी, पाणी पिण्यासाठी मातीची भांडी भरून ठेवली आहेत. त्याचे फोटो शेअर केल्यावर नेटकऱ्यांकडून तिचे कौतुक करण्यात आले. या फोटोंना कॅप्शन देत जॅकलीनने सांगितले की, “उन्हाळ्याच्या दिवसात प्राण्यांची तहान भागवण्यासाठी आणि डिहायड्रेशनपासून त्यांचा बचाव करण्यासाठी नेहमी पाण्याने भरलेली भांडी तुमच्या परिसरात ठेवा आणि पशू-पक्ष्यांची तहान भागवा.”

हेही वाचा : आलियाच्या ‘या’ सवयीमुळे रणबीर कपूर होतो नाराज! अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…

हेही वाचा : ‘जवान’च्या दिग्दर्शकाने शेअर केली बाळाची पहिली झलक! पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, नाव ठेवले खूपच खास…

जॅकलीन पुढे म्हणाली, “पाण्याने भरलेली ही भांडी वेळोवेळी रिकामी करायला विसरू नका जेणेकरून या पाण्यात घाण साचणार नाही. तुम्हालाही मला जर या कामात साथ द्यायची असेल तर मला टॅग करा आणि तुमची पोस्ट शेअर करा.” तसेच पशू-पक्ष्यांना कायम मदत करा, असे आवाहन तिने ही पोस्ट शेअर करताना केले आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या दोन वर्षांपासून यू ओन्ली लिव्ह वन्स (YOLO) या सोशल फाऊंडेशनसोबत काम करीत आहे. जॅकलीनची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandes urges people to keeps water bowls on streets for animals in summer season sva 00