बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस काही काळापासून तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरबरोबरच्या नात्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. त्यामुळे तिला अनेक वेळा चौकशीला सामोरेही जावे लागले आहे. जॅकलिनने सुकेशबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचे स्पष्टपणे नाकारले असले तरी सुकेशने तुरुंगातून जॅकलिनला अनेक वेळा प्रेमपत्रे पाठवली आहेत. आता या प्रकरणी अभिनेत्रीने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे सुकेशविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने सुकेश तुरुंगात असूनही मला सतत त्रास देत आहे; तसेच सुकेशने तिला धमक्या दिल्या असल्याचा दावाही केला आहे. तसेच जॅकलिनने तिच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी दिल्ली पोलिसांकडे केली आहे. तसेच सुकेशच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, जॅकलिनने दिल्ली पोलिसांना आयपीसीच्या कलमांतर्गत या प्रकरणाची दखल घेऊन मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

जॅकलिनने पत्रात लिहिले आहे, “मी एक जबाबदार नागरिक आहे. या प्रकरणात जबरदस्ती करण्यात येत आहे. सध्या मी सरकारी साक्षीदार बनविल्यानंतर सुकेश मला सतत टार्गेट करीत आहे. माझ्यावर सतत मानसिक दबाव निर्माण केला जात आहे. तुरुंगात बसून सुकेश मला सतत धमक्या देत आहे आणि त्रास देण्याचे नवनवीन मार्ग अवलंबत आहे.”

हेही वाचा- लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराला दिले ‘हे’ खास गिफ्ट, अभिनेत्री म्हणाली…

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी सुकेश चंद्रशेखरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा व नऊ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट म्हणून दिली होती. तसेच दोघांचे काही रोमँटिक फोटोही व्हायरल झाले होते. एवढेच नाही तर सुकेशने अनेकदा जॅकलिनला तुरुगांतून प्रेमपत्रेही लिहिली आहेत. या प्रकरणी जॅकलिनबरोबर नोरा सारा अली खान, चाहत खन्ना या अभिनेत्रींची नावे जोडण्यात आली होती. तसेच फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांचीही सुकेशने फसवणूक केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez complains against sukesh chandrashekhar to delhi police commissioner over threats and harrasment dpj