‘शोले’ हा भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण देणारा चित्रपट ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात ‘शोले’साठी विशेष जागा आहे. याचबरोबर ‘जय संतोषी माँ’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता अन् या चित्रपटानेही एक वेगळाच इतिहास रचला. १९७५ साली आलेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं होतं. त्यावेळी एकाच वेळी १०४ थिएटर्स मध्ये हा सिनेमा चालत होता. चित्रपटगृहांचं रूपांतर मंदिरात झालं होतं. चला तर ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागात ‘जय संतोषी माँ’ चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट जाणून घेऊयात…

Story img Loader