बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. फार कमी वेळात जान्हवीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टी सुरू आहेत. ज्यामुळे जान्हवी कपूर जास्त चर्चेत आहे. प्रोफेशनल लाइफसह ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सध्या जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडसह दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर तिचा कथित एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियासह दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी गुलाबी रंगाच्या सूटमध्ये एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी ती हसून फोटोग्राफर्सना पोज देतानाही दिसत आहे. नंतर ती कारमध्ये जाऊन बसते. जी कार तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर ड्राइव्ह करत असलेला दिसत आहे. याशिवाय नुकतीच निर्माता अमृत पाल बिंद्राच्या दिवाळी पार्टीमध्येही ती शिखरसह दिसली होती.

आणखी वाचा-जान्हवी कपूरने खुशीला दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, “कधीच कोणत्या अभिनेत्याला डेट करू नको, कारण…”

जान्हवी कपूरला एक्स बॉयफ्रेंडसोबत पाहून, पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. जान्हवी कपूर पुन्हा एकदा शिखर पहारियासह रिलेशनशिपमध्ये आहे असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने जान्हवी कपूरचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशा परिस्थितीत तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- जान्हवी कपूरने केला श्रीदेवी यांच्या लोकप्रियतेबद्दल खुलासा; म्हणाली “तिच्या आसपासही कुणी…”

दरम्यान शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीचा काही काळ जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत होते, पण नंतर दोघे वेगळे झाले. कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये अभिनेत्रीनेच या डेटिंग अफवांना पुष्टी दिली होती. जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटची ‘गुडलक जेरी’मध्ये दिसली होती, त्यानंतर ती आता ‘मिली’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor again date with shikhar pahariya video goes viral mrj