अभिनेत्री जान्हवी कपूर मागच्या काही काळापासून तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अलीकडे ती तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियामुळे चर्चेत आली आहे. मागच्या आठवड्यात तिचा आणि शिखरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा ती त्याच्याबरोबर कारमध्ये परतताना दिसली. त्यामुळे जान्हवी आणि शिखरचं नक्की ब्रेकअप झालंय की नाही अशी चर्चा होताना दिसत आहे. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे.
जान्हवी कपूर पुन्हा करतेय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट? व्हिडीओ व्हायरल
२९ डिसेंबरला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये जान्हवी कपूरही उपस्थित होती. यावेळचा तिचा आणि शिखर पहारियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा ते दोघे एकत्र दिसले आहेत.
जान्हवी कपूर रिया कपूर आणि करण बुलानीच्या डिनर पार्टीमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाबरोबर पोहोचली होती. दोघांचा कारमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. फोटोग्राफर्सनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जान्हवीने लाजत आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिखर कार चालवत होता, तर जान्हवी त्याच्या शेजारी बसली होती.
दरम्यान, जान्हवी व शिखरने काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट केलं होतं. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता पुन्हा ते एकत्र आल्याची चर्चा आहे. ‘इ-टाइम्स’ दिलेल्या वृत्तानुसार जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांच्या नात्याला नव्याने आणखी एक संधी देण्याचा विचार केला आहे.”