जान्हवी कपूरने करण जोहरचा शो कॉफी विथ करणमध्ये बहीण खुशी कपूरबरोबर हजेरी लावली. या शोमध्ये जान्हवीने तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तसेच लव्ह लाइफबद्दलही तिने मोठा खुलासा केला. ती शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर दोघांचा एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये ते आंध्र प्रदेशमध्ये देवदर्शनाला पोहोचले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जान्हवी व शिखर एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघेही आधी एकमेकांना डेट करत होते, पण काही कारणास्तव ते वेगळे झाले होते. पण नंतर मात्र पुन्हा ते एकत्र आले आणि आता ते रिलेशनशिपमध्ये आहेत. ते बऱ्याचदा देवदर्शलाही जाताना दिसतात. शुक्रवारी जान्हवी कपूरने शिखर पहारियाबरोबर आंध्र प्रदेशमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तिचा व शिखरचा दर्शनाला जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Video: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, प्रेमाची कबुली दिल्यानंतर शिखरसह पोहोचली देवदर्शनाला

आता शिखरचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकरबरोबर दिसत आहे. शिखर व साराने मित्रांबरोबर शुक्रवारी एकत्र पार्टी केली. नंतर दोघेही गाडीत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शिखर व सारा चांगले मित्र आहेत.

जान्हवी कपूरने भर कार्यक्रमात घेतलं बॉयफ्रेंडचं नाव, ‘अशी’ होती बहिणीची प्रतिक्रिया

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. काहींनी कमेंट्समध्ये जान्हवी कपूर व शुबमन गिलचा उल्लेख करत विनोदी कमेंट्स केल्या आहेत. सारा व शुबमन यांच्या डेटिंगच्या चर्चा आहेत. तर जान्हवीने नुकतंच शिखरबरोबरचं तिचं नातं अधिकृत केलंय. या पार्श्वभूमीवर शिखर व सारा एकत्र दिसल्यानंतर जान्हवी व शुबमनच्या नावाने मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.