Shikhar Pahariya post about Dheere Dheere Song: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच तेलुगू सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरबरोबर (JR NTR)  स्क्रीन शेअर करणार आहे. ती व ज्युनिअर एनटीआर ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दुसरं गाणं ‘धीरे-धीरे’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्याबद्दल जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

चित्रपट निर्माते बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लाडकी लेक जान्हवी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. तिला पदार्पणाच्या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. यातील ‘धीरे-धीरे’ हे गाणं सोमवारी रिलीज करण्यात आलं. गाण्यात जान्हवी व ज्युनिअर एनटीआर यांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

Video: “धीरे धीरे…”, ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या रोमँटिक गाण्याचा धुमाकूळ, नेटकरी म्हणाले, “ज्युनियर श्रीदेवी…’

गाण्यातील जान्हवीचा हॉट लूकही चांगलाच चर्चेत असून हे गाणं सोशल मीडियावर गाजतंय. अशातच तिच्या बॉयफ्रेंडनेही गाण्याचं कौतुक केलं आहे. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ स्टोरीवर पोस्ट करताना शिखर पहारियाने ‘wow wow wow maaasss’ असं लिहिलं आहे.

शिखर पहारियाची स्टोरी

shikhar pahariya reaction on janhvi kapoor song
शिखर पहारियाची इन्स्टाग्राम स्टोरी

गर्लफ्रेंड जान्हवी कपूरसाठी शिखरने केलेली पोस्ट चांगली चर्चेत आहे. शिखर व जान्हवी दोघेही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जान्हवी व शिखर अनेक इव्हेंट्सना एकत्र हजेरी लावतात. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातही जान्हवी व शिखरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

दरम्यान, ‘धीरे-धीरे’ या गाण्याबद्दल बोलायचं झाल्यास ते संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याची गायिका शिल्पा राव असून कौसर मुनीर यांनी हे गाणं लिहिलं आहे. हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम या पाच भाषांमध्ये हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं सध्या युट्यूबवर ट्रेंड करत आहे.

श्वेता बच्चनला खूप आवडायचा वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड; त्याची ‘ही’ वस्तू जवळ घेऊन झोपायची, स्वतःच केलेला खुलासा

जान्हवी कपूरचा ‘उलझ’ २ ऑगस्टला झाला प्रदर्शित

सुधांशू सारिया दिग्दर्शित ‘उलझ’ या स्पाय थ्रिलर चित्रपटामध्ये जान्हवी कपूरसह गुलशन देवैया व रोशन मॅथ्यू महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती विनीत जैन व जंगली पिक्चर्स यांनी केली आहे. ही कथा एका तरुण आयएफएस अधिकाऱ्याची आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे.

Story img Loader