लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी (४ जून रोजी) जाहीर झाले. या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ३० जागा जिंकण्यात महाविकास आघाडीला यश आलं. त्यापैकी काँग्रेसला १३, भाजपा ९, ठाकरे गट ९, शरद पवार गट ८, एकनाथ शिंदे गट ७, अजित पवार गट १ व अपक्ष उमेदवाराला एका जागेवर यश मिळालं आहे. सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. मावशी विजयी झाल्यानंतर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

शिखर पहारिया हा प्रणिती शिंदेंच्या मोठ्या बहीण स्मृती शिंदे पहारिया व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सोलापुरात जवळपास ५२ टक्के मतं मिळवून विजयी झालेल्या प्रणिती शिंदेंसाठी शिखरने खास पोस्ट केली आहे. मावशी खासदार झाल्यावर शिखरने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीने प्रचार करूनही हरले तिचे बाबा, पराभवानंतर पोस्ट करत म्हणाली, “ज्यांनी माझ्या वडिलांवर…”

शिखर पहारिया इनस्टाग्राम स्टोरी

शिखरने प्रणिती शिंदेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “The people of Solapur have spoken” असं कॅप्शन देत त्याने मावशीला टॅग केलं आणि रेड हार्ट इमोजी वापरला आहे. सोलापूरकरांनी करून दाखवलं अशा आशयाचं कॅप्शन देत शिखरने मावशीचं अभिनंदन केलं आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत विजयानंतर प्रणिती शिंदेंभोवती कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याने दुसरी एक स्टोरी रिपोस्ट केली आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Shikhar-Post-1.mp4

राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”

सोलापूर मतदारसंघ हा भाजपा काँग्रेस दोन्हीसाठी प्रतिष्ठेचा होता. याठिकाणी भाजपाने राम सातपुते यांना आमदार प्रणिती शिंदेविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. पण प्रणिती शिंदे ही जागा टिकवण्यात यशस्वी झाल्या. यंदाच्या निवडणुकीत एकूण १२ लाख ४६११ मतांपैकी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सहा लाख २० हजार २२५ (५१.४८ टक्के) मते मिळवून ८० हजार २९७ मताधिक्याने विजय खेचून आणला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे राम सातपुते यांच्या पारड्यात पाच लाख ४६ हजार २८ ४५.५२ टक्के) मते पडली.