Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी त्यांचं नातं अधिकृत केलं असून ते एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात. शिखर व जान्हवी दोघेही अनेक इव्हेंट्सना एकत्र जातात, इतकंच नाही तर ते सोशल मीडियावरही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात. शिखर पहारियाच्या एका पोस्टवर ट्रोलरने जातीयवादी कमेंट केली. या ट्रोलरला शिखरने खडे बोल सुनावले आहेत.

शिखर पहारियाने दिवाळीनिमित्त एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याच्याबरोबर जान्हवी कपूर देखील होती. काही फोटोंमध्ये शिखर व त्याचे पाळीव श्वान आहेत. हे फोटो पोस्ट करून शिखरने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याच पोस्टवर एका तरुणीने ‘पण तू तर दलित आहेस,’ अशी कमेंट केली. शिखरने ती पोस्ट व त्यावरील ती कमेंट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

पोस्टमध्ये शिखरने लिहिलं, “खरं तर २०२५ मध्ये, तुमच्यासारख्या संकुचित व मागासलेल्या विचारसरणीचे लोक आहेत ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. दिवाळी हा प्रकाश, प्रगती आणि एकतेचा सण आहे. पण या सगळ्या गोष्टी तुमच्या संकुचित बुद्धीला समजण्यापलीकडच्या आहेत.”

शिखर पहारियाची पोस्ट

Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya lashes out at troll for casteist remark
शिखर पहारियाची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

पुढे त्याने लिहिलं, “भारताची शक्ती येथील सांस्कृतिक विविधतेमध्ये आहे, पण ही गोष्टी तुम्ही नक्कीच तुम्हाला समजणार नाही. असं अज्ञान पसरवण्यापेक्षा तुम्ही स्वतःला शिक्षित करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण सध्या तरी एकमेव ‘अस्पृश्य’ गोष्ट म्हणजे तुमची विचार करण्याची पातळी होय.” जातीवरून ट्रोल करणाऱ्या या ट्रोलरला शिखरने सडेतोड उत्तर दिलं आहे. शिखरची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे शिखर

शिखर पहारिया हा संजय व स्मृती पहारिया यांचा मुलगा आहे. शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती पहारिया या सुशील कुमार शिंदे यांच्या थोरल्या कन्या होय. खासदार प्रणिती शिंदे या शिखरच्या मावशी आहेत. शिखरचा भाऊ वीर पहारिया हा अभिनेता आहे.

शिखरने काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्त त्याच्या आई स्मृती, आजी उज्वला शिंदे व गर्लफ्रेंड जान्हवी कपूर यांच्यासाठी खास पोस्ट केल्या होत्या. शिखर त्याचे आजी-आजोबा व मावशी यांच्याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो.

Story img Loader