जान्हवी कपूर ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. आपल्या फॅशनमुळे चर्चेत असणारी जान्हवी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवीने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे. अलीकडेच ‘कॉफी विथ करण’ मध्ये जान्हवीने हजेरी लावली होती. तेव्हाच तिने शिखरबरोबरच्या नात्याबद्दल शिक्कामोर्तब केलं. शिखरचा भाऊ वीर व आई स्मृती शिंदे यांच्या एका फोटोवर जान्हवीने केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.

शिखर पहारियाची आई म्हणजेच स्मृती शिंदे यांचा ४ फेब्रुवारीला वाढदिवस होता. या निमित्ताने शिखरचा भाऊ वीर याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वीर पहारियानं त्याचा आणि त्याच्या आईचा आताचा आणि लहाणपणीचा फोटो शेअर केला. यावर जान्हवीने ‘बेस्ट पीपल’ अशी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर ओरीने ‘आय मिस हर’ अशी कमेंट केली. जान्हवीसह इतर कलाकारांनीसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

हेही वाचा… ऐश्वर्या-अभिषेकच्या ‘या’ चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना आला होता खूप राग; ‘हे’ होते कारण

पहारिया भावंडाची चर्चा अनेकदा ‘कॉफी विथ करण’ च्या एपिसोडमध्ये झाली आहे. यावेळी शोमध्ये जान्हवी शिखरबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसली. शिखरने तिला कसा पाठिंबा दिला, याबाबत तिने सांगितलं. गेल्या वर्षी जेव्हा जान्हवी कपूर आणि सारा अली खान ‘कॉफी विथ करण’ च्या शो मध्ये आल्या होत्या तेव्हासुद्धा अप्रत्यक्षपणे पहारिया भावंडाची चर्चा झाली होती. त्यावेळी वीर पहारिया साराचा एक्स बाॅयफ्रेंड असल्याचंही समोर आलं होतं.

जान्हवी आणि शिखर खूपदा एकत्र दिसतात. अनेक वेळा हे जोडपं तिरूपती मंदिरात दर्शनासाठी जातानाही दिसलं. कपूर कुटुंबातील अनेक सोहळ्यांमध्येही शिखर सहभागी होतो. शिखरच्या भावाबद्दल सांगायचं झालं तर, वीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमारसह ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात तो दिसणार असून हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये वीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा पहिला लूक देखील शेअर केला होता. हा चित्रपट भारतातील पहिल्या आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्यावर आधारित असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा… ‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने का सोडले मालिकाविश्व? म्हणाला, “स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या…”

दरम्यान जान्हवी, सैफ अली खान आणि ज्युनिअर एनटीआरसह ‘देवरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तेलुगूत पदार्पण करणार आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या आगामी चित्रपटातही जान्हवी झळकणार आहे. याशिवाय जान्हवी वरुण धवनसोबत एका रोमँटिक चित्रपटातही काम करणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader