बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या लाडक्या लेकीने, जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अगदी थोड्या वेळामध्ये तिने सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तिचे आतापर्यंत ‘गुंजन सक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘मिली’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली. सध्या ती या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवीच्या चित्रपटांप्रमाणे तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असतात. मध्यंतरी जान्हवीचा तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारियासह रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली होती. जान्हवी निर्माते अमृत पाल बिंद्राच्या दिवाळी पार्टीमध्येही त्याच्यासह उपस्थित होती. मध्यंतरी तिने सारा अली खानसह ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा तिने शिखर पहारियाला डेट केल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले होते. तिच्या व्हायरल व्हिडीओवरुन ते दोघे पुन्हा डेट करत असल्याचे शक्यता वर्तवली जात होती.

आणखी वाचा – तापसी पन्नू व फोटोग्राफर यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद, नेटकरी म्हणाले, “जया बच्चन…”

दिवाळी निमित्त कपूर परिवाराने मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला जान्हवीसह अनिल कपूर, अंशुला कपूर, बोनी कपूर अशा कपूर परिवारातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये दुसरा तिचा कथित प्रियकर अक्षत राजन देखील उपस्थित होता. यापूर्वीही ती आणि अक्षत रिलेशनशीपमध्ये आहेत असे म्हटले जात होते. पण या पार्टीमधील त्याच्या उपस्थितीमुळे जान्हवी कपूर नक्की कोणाला डेट करत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आणखी वाचा – Video : सैफ अली खानची पॅण्ट खाली खेचत होता तैमूर अन्…; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

‘मिली’ चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. तिचा हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये ती मिली नौटियाल या मध्यवर्ती भूमिकेमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor celebrates diwali with akshat rajan and shikhar pahariya yps