अभिनेत्री जान्हवी तिच्या आईच्या दाक्षिणात्य प्रथा, परंपरा यांच्यावर फार विश्वास ठेवते. तिची देवावर फार श्रद्धा आहे आणि अनेकदा तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी जाताना ती दिसली आहे. २७ वर्षे पूर्ण करत ६ मार्च रोजी जान्हवीने तिचा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त जान्हवी तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी गेली होती आणि मंदिरात जाताना गुडघे टेकत ती पायऱ्या चढली.

जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया आणि सोशल मीडिया स्टार असलेला तिचा जवळचा मित्र ओरी यांच्यासह तिरुपतीच्या दर्शनासाठी गेली होती. याचा व्हिडीओ ओरीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. जान्हवी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओरी आणि शिखरबरोबर तिरुमालाला पोहोचली. या दिवशी तिने पिच रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

हेही वाचा… ‘गुलाबी साडी…’, मराठी गाण्यावर आजीसह थिरकली अदा शर्मा; व्हिडीओ व्हायरल

जान्हवीने सांगितलं की ती तिरुपतीला किमान पन्नास वेळा आली असेल. तर शिखर नऊ वेळा. तिरुपतीला येण्याची ओरीची ही पहिलीचं वेळ होती. सुरुवातीलाच त्यांनी २१०० पायऱ्या पार केल्या. तिथल्याच एका मंदिरात जाताना जान्हवी गुडघे टेकत पायऱ्या चढली.

ओरीच्या व्हिडीओमध्ये जेव्हा त्याने जान्हवीला विचारलं की, तुला आज कसं वाटतय? यावर जान्हवी म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क कमावणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही ते कमवण्याचा प्रयत्न करत आहोत.” मंदिराच्या दिशेने जात असताना शिखरही आपली भावना व्यक्त करत म्हणाला, “जीवनात जर शांती मिळवायची असेल तर ती बालाजीच्या चरणी मिळेल.”

हेही वाचा… VIDEO: होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले, “वयाचा विसर पडेल…”

जान्हवीच्या वाढदिवशी तिने खास लाल आणि जांभळ्या रंगाची दाक्षिणात्य पद्धतीची साडी नेसली होती. ओरी आणि शिखरने सफेद रंगाची लुंगी आणि शाल परिधान कली होती. दर्शन झाल्यानंतर विमानात केक कापून सगळ्यांनी जान्हवीचा वाढदिवस साजरा केला.

हेही वाचा… लक्झरी कार्स भाड्याने घेतलेल्या, तर दुबईत घराची माहितीही खोटी; एल्विश यादवच्या संपत्तीबाबत पालकांचा मोठा खुलासा, म्हणाले…

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जान्हवी येत्या काळात ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’, ‘देवरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Story img Loader