श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अनेक महिन्यांपासून तिचं नाव शिखर पहारियाशी जोडलं जात आहे. ती व शिखर अनेकदा एकत्र दर्शनाला जाताना व व्हेकेशनवर जाताना दिसतात. पण त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती दिली नव्हती. पण आता जान्हवीने शिखरबरोबरच्या नात्याची कबुली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवी कपूर व तिची धाकटी बहीण खुशी यांनी ‘कॉफी विथ करण 8’ च्या ताज्या भागात हजेरी लावली. यावेळी त्या दोघींनी आईचं निधन, व्यावसायिक आयुष्य व वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. याचदरम्यान जान्हवीने शिखरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं.

दोन महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न, आता प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; म्हणाली, “मला माहित आहे की…”

करण जोहरने जान्हवीला विचारलं की, तू सर्वात शिखर पहारियाबरोबर डेट करत होती, त्यानंतर तू दुसऱ्या कोणाबरोबर डेट केलंस. पण आता तू पुन्हा शिखरला डेट करत आहेस. हे खरं की खोटं? यावर जान्हवीने सांगितलं की, हे खरे आहे की ती दुसऱ्या कोणाला तरी डेट करू लागली होती. पण आता ती शिखरबरोबर पुन्हा डेट करत आहे.

जान्हवी कपूरने भर कार्यक्रमात घेतलं बॉयफ्रेंडचं नाव, ‘अशी’ होती बहिणीची प्रतिक्रिया

जान्हवी म्हणाली, “जेव्हा मी दुसऱ्या कुणाला तरी डेट करत होते तेव्हा शिखर माझ्यासाठी ‘नादान परिंदे घर आजा’ हे गाणं गाायचा.” तिने शिखरचं खूप कौतुक केलं.”तो सुरुवातीपासूनच एका चांगल्या मित्रासारखा माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत आहे. तो आमचा एक मजबूत आधार आहे. शिखरला माझ्याकडून कधीही काहीच नको होतं, तो फक्त माझ्यासोबत होता. त्याने माझ्यावर कधीही दबाव आणला नाही,” असं जान्हवीने नमूद केलं.

Videos: आयरा खान व नुपूर शिखरे यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न, मुकेश अंबानींनी पत्नीसह लावली हजेरी, व्हिडीओ आले समोर

यानंतर, जेव्हा करणने जान्हवीची मस्करी केली तेव्हा ती गमतीने म्हणाली ‘मी आणि शिखर फक्त चांगले मित्र आहोत’. दरम्यान, जान्हवी व शिखर बरेचदा एकत्र मंदिरात जाताना, पार्टीला जाताना दिसतात. दोघांनी आधी एकमेकांना डेट केलं होतं, पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पण आता पुन्हा आपण एकत्र असल्याचं जान्हवीने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor confirms dating shikhar pahariya says is strongest support for family hrc