दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि आता बोनी कपूर यांची मुलगी जानवी कपूर हिने २०१८ साली करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती विविध चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली. पण तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरू शकला नाही. आज जान्हवी तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे चित्रपट अपयशी जरी ठरले असले तरीही ती वर्षभरात कोट्यवधी रुपये कमावते.
जान्हवी तिच्या कामापेक्षाही तिच्या लाईफस्टाईल आणि तिच्या फॅशनमुळे अधिक चर्चेत असते. ही लाईफस्टाईल तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीवर मिळवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ती ५८ कोटींची मालकीण आहे. तर दर महिन्याला ती ५० लाख रुपये कमावते.
आणखी वाचा : स्टारकिड असल्याचा जान्हवी कपूरला होतोय पश्चाताप? म्हणाली, “माझं नुकसान झालं कारण…”
ज्यांना मी कार्यक्रम आणि कार्यक्रमांमधील सादरीकरणांमधून मोठी रक्कम कमावते. तर सोशल मीडियावर देखील ब्रँडचा प्रमोशन करण्यासाठी एक पोस्ट शेअर करायला ती लाखो रुपये आकारते. याचबरोबर तिला गाड्यांची देखील आवड आहे. तिच्याकडे मर्सिडीज, ऑडी, लँड रोव्हर अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. तर गेल्याच वर्षे तिने स्वतःच्या मेहनतीवर जुहू मध्ये ३८ कोटींचं आलिशान घर विकत घेतलं.
हेही वाचा : श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात होणाऱ्या तुलनेवर बोनी कपूर यांनी केली महत्वाची विधाने
त्यामुळे चित्रपट जरी चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करत नसले तरीही सोशल मीडियावरून, कार्यक्रमांमधून उत्तम पैसे कमावत आहेत.