बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मृत्यूशी दोन हात करताना दिसत आहे. काल रात्री या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले, ज्याला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. पण यावेळी रेखा यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी बॉलिवूडच्या कार्यक्रमांमध्ये आवर्जुन उपस्थित असतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतात. काल रात्री त्यांनी जान्हवी कपूरच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळी रेखा आणि जान्हवी यांचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेखा आणि जान्हवी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघीही प्रेमाने एकमेकांना भेटताना दिसत आहेत आणि रेखाही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. रेखा यांना पाहताच सर्व फोटोग्राफर्सनी त्यांना घेरल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतं. यावेळी जान्हवी कपूर आणि बोनी कपूर स्वतः रेखा यांना घेण्यासाठी बाहेर आले. रेखा यांना पाहून जान्हवी थोडी भावूक होते आणि दुसरीकडे रेखाही तिचे प्रेमाने कौतुक करू लागतात. मग दोघीही एकमेकींची गळाभेट घेताना दिसतात.

आणखी वाचा- जान्हवी कपूरने खरेदी केलं मुंबईत घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओमध्ये रेखा जान्हवीला प्रेमाने मिठी मारताना आणि तिच्याशी बोलताना दिसतात. तसेच जान्हवीही रेखा यांचे कौतुक करते. दोघांचं बॉन्डिंग आई-मुलीच्या नात्यासारखं दिसत आहे. जान्हवीच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर ती गोल्डन शॉर्ट कुर्ती आणि प्लाझोमध्ये दिसली, ज्यासोबत तिने मॅचिंग ओढणीही घेतली होती. तर रेखा कांचीपुरम सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा- ड्रेसला सेफ्टी पिन लावल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

दरम्यान ‘मिली’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर, हा ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. माथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि या चित्रपटाचे निर्माते जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिली’ची टक्कर कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘डबल एक्सेल’शी होणार आहे.