अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. लवकरच ती तिच्या ‘उलझ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आता तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती आजारी पडल्याची माहिती समोर आली होती. तिच्या आजारपणावर वक्तव्य करीत पहिल्यांदा दवाखान्यात दाखल करावे लागल्याचे तिने म्हटले होते. त्याबरोबरच तिच्या आजारपणात तिची काळजी कोणी घेतली यावर तिने वक्तव्य केले आहे.

जान्हवी कपूरने ‘पिंकविला’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने तिच्या आजारपणाबाबत बोलताना म्हटले होते की, मला फूड पॉयजनिंग झाल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, माझी प्रतिकारशक्ती कमी झाल्याने माझ्या अंगात त्राण उरले नव्हते. त्यावेळी मला तीव्र अंगदुखी आणि अशक्तपणाचा सामना करावा लागला. मला माझ्या रोजच्या गोष्टी करण्यातही अडचणी येत होत्या. त्या करण्यासाठी मला कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे मला अपंगत्व आल्यासारखे वाटत होते. मी त्यावेळी चालू शकत नव्हते, व्यवस्थित खाऊ-पिऊही शकत नव्हते.

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
nana patekar wife neelkanti makes her acting comeback in vicky kaushal chhaava movie
Video : ‘छावा’मध्ये झळकणार नाना पाटेकरांच्या पत्नी! नव्या गाण्यात दिसली पहिली झलक, नीलकांती पाटेकर कोणती भूमिका साकारणार?
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
shraddha kapoor on living with parents
“माझ्या आई-वडिलांनी माझं…”, श्रद्धा कपूरने कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव केला शेअर; म्हणाली, “आमच्या खोलीच्या दारावर…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

काय म्हणाली जान्हवी कपूर?

जान्हवी कपूर म्हणते की, त्या आजारपणात घरचे कोणीतरी जवळ असायला पाहिजे, असे मला वाटत होते. पण, वडील भारतात नव्हते. ते कामानिमित्त परदेशात होते. त्यावेळी शिखरच्या आईने माझी माझ्या आईसारखी काळजी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर शिखरची आई स्मृती शिंदे या रात्रभर जान्हवीजवळ होत्या. जान्हवी आणि शिखर हे रिलेशनशिपमध्ये आहेत.

अभिनेत्रीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असल्याचे तिने म्हटले आहे. ती म्हणते, “मला माझ्या आरोग्याबद्दल, तंदुरुस्त असल्याबद्दल नव्याने आदर वाटू लागला आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकणे गरजेचे असते. तुमचे काम आणि इतर गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही सर्वांत मोठी गोष्ट असते.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi : “अत्यंत लज्जास्पद…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख…”

टेलीव्हिजन

दरम्यान, जान्हवी कपूरची आई श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ ला निधन झाले आहे. अनेक चित्रपटांतून विविध भूमिकांमधून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता.

दरम्यान, जान्हवी लवकरच तिच्या उलझ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यामध्ये जान्हवी कपूर सुहानाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तरुण डेप्युटी हाय कमिशनर म्हणून सुहाना काम करताना दिसत आहे; जी लंडन दूतावासातील कठीण मोहिमेवर बारीक नजर ठेवते. ‘उलझ’ चित्रपटात अभिनेता गुलशन देवैया एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच रोशन मॅथ्यूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये गुप्तहेरांचे जीवन कसे धोक्यात येते आणि सुहानाला जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याबद्दलची गोष्ट पाहायला मिळत आहे. सुधांशु सारिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader