अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेबाबत मोठा खुलासा केला आहे. ही घटना जेव्हा ती फक्त १० वर्षांची होती, तेव्हा घडली होती. पापाराझींनी पहिल्यांदा तिचे फोटो काढले त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला होता.
‘अॅनिमल’साठी रश्मिका मंदानाने किती मानधन घेतले? जाणून घ्या अभिनेत्रीची एकूण संपत्ती
जान्हवी म्हणाली, “कॅमेरा नेहमीच माझ्या आयुष्याचा एक भाग राहिला आहे. आमच्या लहानपणी आम्ही बाहेर पडलो की लोक आमच्या परवानगीशिवाय आमचे फोटो काढायचे. मी जेव्हा दहा वर्षांची होते आणि चौथीत होते तेव्हा माझा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत होता. जेव्हा मी कॉम्प्युटर लॅबमध्ये गेले तेव्हा मी कॉम्प्युटर स्क्रीनवर माझा पापाराझी फोटो पाहिला.”
जान्हवी म्हणाली की लहान असताना ती अनकंफर्टेबल असायची. ती नटून थटून राहायची नाही, त्यामुळे तिचे मित्रमैत्रिणीही तिच्यापासून लांब राहायचे. “मला वाटत नाही की ते मला समजू शकायचे. त्यांना मी आवडायचे नाही. मला समजत नव्हतं की काय होत आहे? माझे मित्र माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते, मी व्हॅक्सिंग करत नव्हते, त्यामुळे ते माझी चेष्टा करायचे,” असं जान्हवी ‘न्यूजलाँड्री’शी बोलताना म्हणाली.
एका घटनेचा उल्लेख करत ती म्हणाली, “जेव्हा माझ्या फोटोंशी छेडछाड केली गेली होती, तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. कोणीतरी माझे फोटो एडिट करून अॅडल्ट पेजवर व पॉर्नोग्राफिक साइटवर पोस्ट केले गेले. नंतर ते फोटो मी जवळजवळ प्रत्येक अॅडल्ट पेजवर पाहिले होते. हे पाहून मला धक्का बसला होता. लोकांना ते एडिटेड फोटो खरे वाटत होते, हे दुर्दैवी होतं. सध्या एआयमुळे (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे,” असं मत जान्हवीने व्यक्त केलं.