२० ऑगस्ट रोजी सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या बाळाचा जन्म झाला. या निमित्ताने कपूर परिवाराने मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सोनम-आनंद यांनी मिळून त्यांच्या बाळाचे नाव वायु असे ठेवल्याची घोषणा केली होती. या पार्टीला अनिल कपूर, अर्जुन कपूर, बोनी कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गरोदरपणामुळे सोनम कपूर मागच्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीपासून लांब राहिली होती.

वायुच्या जन्मानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर मावशी बनली. ती सध्या तिच्या ‘मिली’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. दरम्यान एका प्रमोशनल कार्यक्रमामध्ये तिला ‘वायु त्याच्या आईसारखा दिसतो की, बाबासारखा?’ असा सवाल विचारला होता. तेव्हा जान्हवीने अजूनही त्याला पाहिलं नसल्याची माहिती दिली. ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “खरं सांगायचं तर मी त्याला पाहिलं नाहीये. या काळात मी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये होते. त्यामुळे मला सतत प्रवास करावा लागायचा. घाईघाईमध्ये काहीही करणं मला आवडत नाही. काम संपल्यावर मी आरामात त्याला भेटायला जाणार आहे.”

आणखी – ‘पाताळ लोक’चा दुसरा सीझन कधी येणार? अभिनेते जयदीप अहलावत यांनी दिली अपडेट, म्हणाले…

जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये तिने मिली नौडियाल हे पात्र साकारले आहे. तिच्यासह मनोज पाहवा, सनी कौशल आणि संजय सुरी अशा कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. बोनी कपूर यांनी ‘हेलन’च्या निर्मात्यांकडून चित्रपटाचे हक्क घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. ‘हेलन’ आणि ‘मिली’ या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले आहे.

आणखी – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या लग्नात जान्हवी कपूरने हाताची नस कापली अन्…; नेमकं काय घडलं होतं?

या वर्षामध्ये तिचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पुढच्या वर्षी तिचे ‘बवाल’ आणि ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ असे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ यांच्या ‘जन गन मन’ या चित्रपटामध्ये ती विजय देवरकोंडासह दिसू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

Story img Loader