बॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असणारी जान्हवी कपूर ही लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. ज्युनिअर एनटीआर व सैफ अली खान यांच्यासह जान्हवी लवकरच ‘देवारा’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जान्हवीने अमेरिकेत जाऊन अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं. पण हे सगळं प्रशिक्षण निरर्थक होतं असा खुलासा नुकताच जान्हवीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेत जाण्यापेक्षा भारतात राहून इथल्या लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल, भाषांबद्दल जाणून घ्यायला हवं होतं असं वक्तव्य जान्हवीने केलं आहे. या सगळ्या गोष्टींचा तिला अभिनयात आणखी जास्त फायदा झाला असता हेदेखील तिने नमूद केलं आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’च्या हिंदी रिमेक ‘धडक’मधून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी तिने ‘ली स्ट्रसबर्ग थिएटर एन्ड फिल्म इंस्टीट्यूट’मधून अभिनयाचे धडे गिरवले.

आणखी वाचा : भुताटकीच्या ‘त्या’ अनुभवांबद्दल अजय देवगणचा खुलासा; म्हणाला, “आम्ही जेव्हा…”

अमेरिकेत घेतलेले प्रशिक्षण तिथल्या फिल्म इंडस्ट्रीला समोर ठेवून देण्यात आले होते, त्याचा फायदा भारतात येऊन काम करण्यात अजिबात झाला नाही असं जान्हवीने स्पष्टपणे सांगितलं. ‘द वीक’शी संवाद साधताना जान्हवी म्हणाली, “खरं सांगायचं झालं तर मी तिथे काहीच शिकले नाही. त्या अॅक्टिंग स्कूलची पद्धत ही त्यांच्या मुळांना धरून होती. तिथे ऑडिशन कशी घेतली जाते, कास्टिंग एजंटशी कशाप्रकारे संपर्क साधायचा यासाठी त्याचा उपयोग व्हायचा.”

पुढे जान्हवी म्हणाली, “हा वेळ जर मी आपल्या देशाबद्दल, लोकांबद्दल जाणून घ्यायला, भाषा शिकायला दिला असता तर त्याचा आणखी फायदा झाला असता, कारण शेवटी मी भारतीय लोकांची कथाच सादर करणार आहे. जेव्हा मी ‘धडक’चं चित्रीकरण सुरू केलं तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण आपल्या देशाशी निगडीत आणि लोकांशी निगडीत गोष्टी सांगायच्या आहेत. अमेरिकेत राहून मालिबू क्लब मध्ये जाण्यापेक्षा तो वेळ मी आपल्या देशाची संस्कृती जाणून घ्यायला द्यायला हवा होता.” जान्हवी कपूर नुकतीच नितेश तिवारी यांच्या ‘बवाल’मध्ये झळकली. या चित्रपटात जान्हवी कपूरसह वरुण धवनही मुख्य भूमिकेत होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor says she learnt nothing in acting school from america avn
Show comments