जुलै महिन्यामध्ये हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिने जया कुमारी ऊर्फ जेरी ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आनंद एल. राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘गुड लक जेरी’नंतर जान्हवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या ‘मिली’ या आगामी चित्रपटासंबंधित नवी माहिती समोर आली आहे.

या चित्रपटाचे टीझर आज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. जान्हवी एका फ्रीजिंग रुममध्ये अडकलेली असल्याचे या टीझरमध्ये पाहायला मिळते. ४८ सेकंदांच्या या टीझरमध्ये सनी कौशल आणि मनोज पाहवा हे कलाकार देखील दिसत आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तिने चित्रपटाचे पोस्टर तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहे.

आणखी वाचा – गरोदरपणाच्या सातव्या महिन्यामध्ये आलिया भट्ट रणबीर कपूरसाठी उपवास करणार, कारण…

दरम्यान एका मुलाखतीमध्ये जान्हवीने घराणेशाहीच्या मुद्द्यांवरुन सुरु असलेल्या चर्चांवर भाष्य केले. गुडटाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “लोक मला गृहीत धरतात. माझ्याकडे स्टारकिड असल्याने विशेषाधिकार आहेत असा त्यांचा समज झाला आहे. मी काम करताना मेहनत घेत नाही असे त्यांना वाटते. मी सर्वात प्रभावशाली किंवा सुंदर नसेन, पण मला सेटवरील सर्वात कष्टाळू व्यक्ती असल्याचा मला गर्व आहे. कोणीही माझ्या कामाप्रती असलेल्या निष्ठेवर शंका घेऊ शकत नाही.”

आणखी वाचा – तब्बल १८ वर्षानंतर शाहरुख खान ‘या’ दिग्गज कलाकारांबरोबर शेअर करणार स्क्रीन

हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. या मल्याळम चित्रपटामध्ये अभिनेत्री अ‍ॅना बेन प्रमुख भूमिकेमध्ये होती. तिच्या कामाचे कौतुक झाले होते. तसेच तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष ज्यूरी पुरस्कार मिळाला होता. मथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हेलनच्या निर्मात्यांकडून बोनी कपूर यांनी त्याचे हक्क विकत घेत मिलीची निर्मिती केली.

Story img Loader