अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान ‘देवरा पार्ट १’ या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवीन सीझनच्या दुसऱ्या भागात हे कलाकार पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. नेटफ्लिक्स इंडियाने बुधवारी सकाळी या एपिसोडचा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान डम्ब शराज खेळताना दिसतात. याच कार्यक्रमात जान्हवी कपूर तिच्या आई-वडिलांनी एकमेकांच्या संस्कृतीतील गोष्टी कशा आत्मसात केल्या होत्या, हा किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा हा दुसरा सीझन असून या नव्या सीझनच्या दुसऱ्या भागात ‘देवरा पार्ट १’ चे कलाकार खूप धमाल करताना दिसून येत आहेत. यात ज्युनिअर एनटीआर जान्हवी कपूरला चिडवताना दिसून येत आहे. जान्हवीने या शोमध्ये आईच्या आठवणींना उजाळा देताना तिचं बालपण, आई-वडिलांचं प्रेम आणि त्यांच्या नात्याचा अनोखा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा…Jigra Trailer : परदेशात अडकलेल्या भावाची सुटका कशी करणार आलिया भट्ट? ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, गोष्ट आहे खूपच रंजक

जान्हवीने सांगितला आई-वडिलांच्या नात्याचा किस्सा

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये जान्हवीने तिच्या आई-वडिलांबद्दल सांगितलेली गोष्ट ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर हे उत्तर भारतीय, तर श्रीदेवी दक्षिण भारतीय होत्या. जान्हवीने सांगितलं, “पप्पा आधीच दक्षिण भारतीय होऊन गेले होते, कारण ते सकाळच्या नाश्त्याला आलू पराठ्याऐवजी इडली-सांबार खात असत; तर आई उत्तर भारतीयांसारखी भांडायला शिकली होती.”

अजूनही जान्हवीने माझ्यासाठी जेवण आणलेलं नाही

ज्युनियर एनटीआरने या शोमध्ये धडाकेबाज एंट्री केली आणि लगेच जान्हवीला चिडवायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की, “मी हैदराबादमध्ये ‘देवरा पार्ट १’ च्या चित्रीकरणावेळी जान्हवीसाठी दोन वेळा जेवण पाठवलं. मला इथे येऊन एक दिवस पूर्ण झाला आहे तरी जान्हवीने अजून माझ्यासाठी जेवण आणलेलं नाही”, हे ऐकून जान्हवी लाजून हसू लागली.

हेही वाचा…“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”

सैफचा मजेदार प्रतिसाद

कपिलने ज्युनियर एनटीआरला विचारलं की, त्याची आवडती उत्तर भारतीय अभिनेत्री कोण आहे, तेव्हा ज्युनियर एनटीआरने श्रीदेवीचं नाव घेतलं. तेव्हा सैफने उत्तर दिलं की, “श्रीदेवी माझ्यासाठी दक्षिण भारतातील आवडती अभिनेत्री आहे”, हे ऐकून स्टुडिओत हशा पिकला.

हेही वाचा…‘या’ दिग्गज अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर, सचिन पिळगांवकर यांचा खुलासा; म्हणाले, “त्यांचे कुटुंबीय…”

देवरा पार्ट १

‘देवरा पार्ट १’ २७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआर या सिनेमात दुहेरी भूमिका साकारत आहे, तर सैफने भैरा नावाच्या खलनायकाची भूमिका केली आहे. जान्हवी कपूर या सिनेमात थंगमची भूमिका साकारत आहे. ‘देवरा’चा पहिला भाग तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच, या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor share sridevi and boney kapoor memories on kapil sharma show psg