बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिली’मुळे चर्चेत आहे. जान्हवीच्या या चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित आहे. रेस्टॉरंटच्या फ्रीजरमध्ये बंद पडलेल्या मिली नौडियाल नावाच्या मुलीच्या आयुष्यातील घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. हा धक्कादायक अनुभव जान्हवी शेअर केला आहे.

जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मिली फ्रीजरमध्ये बंद झाल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जान्हवी खूप घाबरली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत तिने शूटिंगदरम्यान तिला भीतीदायक स्वप्ने पडायची. स्वप्नात ती स्वतःला कुठेतरी थंड आणि अंधारात कैद असल्याचं पाहायची असं म्हटलं आहे. जान्हवी म्हणाली, ‘जेव्हा मी शूट संपवून घरी यायचे आणि झोपायचे, तेव्हा स्वप्नातही स्वतःला फ्रीझरमध्ये बंद असलेलं पाहायचे.’

आणखी वाचा- “हे एका मुलीबरोबर घडलं असतं तर…” विराटच्या रुमच्या व्हायरल व्हिडीओनंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत

जान्हवी कपूरने पुढे म्हणाली, “या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी खूप आजारी पडले होते. मी दोन-तीन दिवस पेनकिलर घेतल्या. मीच नाही तर चित्रपटाचा दिग्दर्शकही आजारी होता. सतत १५ तास फ्रीजरमध्ये बंद राहून, जिथे तुम्ही जीव वाचवण्यासाठी ओरडत आहात. उंदीर तुम्हाला कुरतडत आहेत, ही परिस्थिती खरोखरच भयानक होती. मी रात्री खूप वाईट स्वप्न पडत असत.”

आणखी वाचा- “भाऊ बहीण वाटतोय ना?” लेकीबरोबर फोटो काढताना बोनी कपूर यांनी फोटोग्राफरना विचारला प्रश्न

या चित्रपटासाठी साडेसात किलो वजन वाढवावं लागल्याचंही जान्हवी कपूरने सांगितलं. ‘मिली’ हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा रिमेक आहे. ‘मिली’चं दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केलं आहे. बोनी कपूर यांनी झी स्टुडिओजच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात जान्हवी कपूर व्यतिरिक्त मनोज पाहवा, सनी कौशल आणि संजय सुरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader