जेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, तेव्हा चित्रकला एक सुंदर माध्यम म्हणून कार्य करते. अलीकडेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर तिच्या मोकळ्या वेळेत बनवलेल्या काही कलाकृतींची झलक शेअर केली.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे अपडेट्स शेअर करते. जान्हवीने तिने स्वतः काढलेल्या चित्रांचा एक फोटो शेअर केला होता. या चित्राचा फोटो शेअर करताना तिने त्याला एक कॅप्शन दिले होते. तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले , “पप्पा जेव्हा मला माझ्या चित्रांबरोबर विद्यार्थ्यांसारखी पोझ देण्यास सांगतात, जेणेकरून ते त्यांच्या मित्रांच्या ग्रुपला ते फॉरवर्ड करून माझ्या खूपच बेसिक आर्ट स्किल्सची स्तुती करू शकतील.” जान्हवी सारखेच तुम्हीही चित्रकलेचा छंद जोपासू शकता. यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
नव्याने चित्रकला शिकणाऱ्यासाठी मार्गदर्शन
नवीन छंद सुरू करताना भीती वाटू शकते. जर तुम्हालाही जान्हवीसारखे तुमचे कलात्मक कौशल्य बेसिक वाटत असेल, ते सुधारण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरता येतील.
जे उपलब्ध आहे त्याचा उपयोग करा
काव रंज, ‘क्रिएटइट’चे डायरेक्टर, म्हणाले, “चित्रकलेसाठी महागडे किंवा विशिष्ट रंग वा ब्रश घेण्याची गरज नाही. एखादे आर्ट स्टेशन तयार करा. समर्पित जागा तुमच्या सवयीला नियमित ठेवेल. कधी कधी कागद आणि पेन्सिलचा किंवा रंगांच्या काही चिठ्ठ्यांचा वापर करा.”
प्रक्रियेवर विश्वास ठेवा
रोशनी भाटिया, आर्ट सायकोथेरपिस्ट यांनी सुचवले “परिपूर्णतेसाठी (परफेक्शन) प्रयत्न करण्याऐवजी चित्रकला एन्जॉय करा. तुमच्या मनानुसार रंग ठरवा आणि आकृतींना आकार द्या.”
रोज थोडा वेळ द्या
स्वतः चित्रकला शिकलेल्या हिमांशी बाथला यांनी सांगितले, “जर तुम्हाला दिवसभरात फारसा वेळ मिळत नसेल, तरीही दहा मिनिटे चित्रकलेसाठी द्या. पेंटिंग परिपूर्णतेबद्दल नसून ती अभिव्यक्तीबद्दल आहे. आवडत्या अन्नाचे किंवा फुलांचे स्केच करून सुरुवात करा आणि त्या प्रक्रियेचा आनंद घ्या.”
हेही वाचा…“माझा प्रेमभंग झाल्यानंतर मी…”, विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी प्रेमात स्वत:ला इतके समर्पित…”
नवेदिता सिंग, आर्ट थेरपिस्ट, म्हणाल्या, “पूर्ण कॅनव्हास रंगांनी भरून काढा. इतरांप्रमाणे ‘मास्टरपीस’ बनवण्याच्या मागे लागू नका. तुम्ही यूट्यूबवरून चित्रकलेचे तंत्र शिकू शकता.”