सध्या बॉलीवूडमध्ये ‘द आर्चीज’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून शाहरुखची लेक सुहाना खान, श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर, आणि अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा असे तीन स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. मात्र, खुशी कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलीवूडमध्ये तिच्या आणि गायक एपी ढिल्लनच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
हेही वाचा : “सरोजजी मला आणि सैफला कानाखाली मारणार होत्या” काजोलने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाली, “सेक्सी-लाज हे शब्द…”
‘ब्राऊन मुंडे’ फेम गायक एपी ढिल्लनने त्याच्या शिंदा काहलोबरोबरच्या अल्बममध्ये ट्रू स्टोरीजच्या ओळींमध्ये खुशी कपूरच्या नावाचा उल्लेख केला आहे. “जदों हस्से तन लागे तू खुशी कपूर” अशी या गाण्यामधील ओळ आहे. एपी ढिल्लनचे हे गाणे रिलीज झाल्यावर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. एपीच्या गाण्यामध्ये खुशी कपूरचा उल्लेख असल्याचे कळताच दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याचा अंदाज चाहत्यांनी वर्तवला.
खुशी कपूर आणि एपी ढिल्लन दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. परंतु, याबाबत दोघांकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एपी ढिल्लन हा इंडो-कॅनडियन गायक आणि रॅपर आहे. ‘एक्सक्यूसेस’, ‘ब्राउन मुंडे’, ‘इंसेन’, ‘दिल नू’, ‘तेरे ते’ अशी अनेक गाणी त्याने गायली आहेत. अनेक बॉलीवूड स्टारदेखील त्याचे चाहते आहेत.
दरम्यान, खुशी कपूर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण आहे. लवकरच खुशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द आर्चीज’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.