बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून होत आहे. दोघेही आधी रिलेशनशिपमध्ये होते पण नंतर त्यांचं ब्रेक अप झालं होतं, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये होती. पण गेल्या काही महिन्यात अनेकदा जान्हवी आणि शिखर एकत्र दिसले. आता पुन्हा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एकदा तर जान्हवी, शिखर, बोनी कपूर आणि खुशी कपूर एकत्र दिसले होते. इतकंच नव्हे तर बोनी यांनी जान्हवी व शिखरबरोबर पोजही दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा दोघेही एकत्र जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरच्या घरी जाताना दिसले. जान्हवी आणि तिचा बॉयफ्रेंड एकाच कारमध्ये गेले. विशेष म्हणजे दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घालत ट्विनींग केल्याचं पाहायला मिळालं. पावसात कारमध्ये एकमेकांशी गप्पा मारत होते, त्यावेळी ते पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. दोघेही एकत्र अर्जुनच्या घरी जाताना दिसल्याने दोघेही लवकरच त्यांचं नातं अधिकृत करतील अशी चर्चा होत आहे.
या वर्षी एप्रिलमध्ये जान्हवी आणि शिखर आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात पूजा करताना दिसले होते. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे भाष्य केलेलं नाही. दरम्यान, शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे.