दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी आहे. पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी श्रीदेवी यांचं निधन झालं होतं. श्रीदेवी यांचे कुटुंबीय आणि चाहते त्यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहत आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच एक वेळ अशी होती जेव्हा श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी आईचा द्वेष करू लागली होती.

‘त्या’ रोमँटिक फोटोमुळे निखिल बने व स्नेहल शिदमला झाला ‘हा’ मोठा फायदा; अभिनेत्री म्हणाली…

laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”
riya sen ashmit patel leaked MMS controversy
दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…
Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!

एका मुलाखतीत जान्हवीने याबद्दल माहिती दिली होती. जान्हवी म्हणालेली, “मी आईचे ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘मॉम’, ‘मिस्टर इंडिया’, ‘रूप की रानी चोरों का राजा’ आणि ‘सदमा’ हे पाच सिनेमेच पाहिले आहेत. याशिवाय आईचे दुसरे कोणतेही सिनेमे मला पाहता आले नाहीत. आईचा सदमा पाहून चित्रपट पाहून मला फारच धक्का बसला होता. या सिनेमात क्लायमॅक्सनंतर श्रीदेवी बरी झाल्यानंतर कमल हासनला पुर्णपणे विसरते. सिनेमाचा हा शेवट पाहून मलाला एवढा राग आला होता की मी दोन दिवस आईशी बोलतच नव्हते. आई कमल हसन यांच्याबरोबर अशी वागूच कशी शकते, याचा राग मला आला होता आणि मी तिच्याशी दोन दिवस बोलले नव्हते,” असं जान्हवीने सांगितलं होतं.

जावेद अख्तरांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर व्हिडीओ शेअर करणाऱ्या अली जफरवर संतापले पाकिस्तानी; अभिनेता म्हणाला, “दहशतवादामुळे आपण…”

जान्हवीला आईचा ‘रुप की रानी चोरों’ का राजा सिनेमा फार आवडतो. या सिनेमात श्रीदेवी यांचा डबल रोल आहे. दरम्यान, जान्हवीने तीन दिवसांपूर्वी आईबरोबरचा एक फोटो शेअर करत भावूक कॅप्शन दिलं होतं. “मम्मा मी आजही तुला खूप मिस करते, प्रत्येक ठिकाणी मी तुला शोधत असते. त्यानंतर तेच करते जे तुला आवडलं असतं,” असं तिने लिहिलं होतं.

अभिनेत्री श्रीदेवी या दुबईला एका लग्नासाठी गेल्या होत्या. तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. जान्हवीचा पहिला सिनेमा ‘धडक’ प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवींचं निधन झालं होतं.

Story img Loader