करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ खूप चर्चेत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये बॉलीवूडमधील काही स्टार येत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड करत आहेत. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरबरोबर सहभागी होणार आहे. या भागाचा प्रोमोही सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये तिने तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाचं नाव घेतलं. त्यानंतर जान्हवी व शिखर एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर दोघांच्या नात्याची मागच्या काही काळापासून चर्चा आहे, पण पहिल्यांदाच जान्हवीने शिखरचं नाव या शोमध्ये घेतलं. शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. जान्हवीने शिखरच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं होतं. ती शिखरला शिखू म्हणते.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

करण जोहरने चॅट शोच्या आगामी एपिसोडमधील जान्हवी आणि खुशी कपूरचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी जान्हवी तिच्याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी शेअर करताना दिसते. ती करणने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देताना दिसते. यावेळी करण तिच्या फोनमध्ये स्पीड डायलवर कोणाचा नंबर आहे हे विचारतो. यावर जान्हवी आधी वडील बोनी कपूर, बहीण खुशी कपूर आणि नंतर शिखू (शिखर पहारिया) याचे नाव घेते. तिसरे नाव घेताच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, जणुकाही तिला शिखरचे नाव घ्यायचे नव्हते, पण तिने चुकून घेतले.

सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

यावेळी करणने खुशी कपूरला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही प्रश्न विचारल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. तिचे नाव ‘द आर्चीज’ फेम अभिनेता वेदांग रैनाशी जोडलं जात होतं. पण आपण फक्त मित्र असल्याचं खुशीने स्पष्ट केलं. तसेच वेदांगनेही या अफवा असल्याचं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. यावेळी जान्हवी तिचे काका अनिल कपूर यांची नक्कल करताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, जान्हवी आणि खुशी या शोमध्ये स्वतःबद्दल आणखी काय खुलासे करतात हे पाहणं मनोरंजक असेल.

सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…, स्वतःच केला खुलासा

जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘एनटीआर 30’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘बवाल’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता. तर, खुशी कपूरने अलीकडेच ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये ती सुहाना खान, अगस्त्य नंदा, वेदांग रैना यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor talks about rumoured boyfriend shikhar pahariya in koffee with karan 8 hrc