बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ‘मिली’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. मिली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान तिला फिल्म सिटीमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी जान्हवीने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

जान्हवीने मिली चित्रपटाच्या प्रमोशनकरिता निळ्या रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान करत खास लूक केला होता. या ड्रेसला ठिकठिकाणी सेफ्टी पिन लावून हटके लूक देण्याचा प्रयत्न डिझायनरने केलेला दिसत आहे. परंतु या ड्रेसवरील सेफ्टी पिनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि त्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन जान्हवीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जान्हवीनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदसह केली आहे.

laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
Siddhivinayak Temple News
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, तोकडे कपडे घातल्यास प्रवेश बंदी; ‘अशी’ आहे नियमावली
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
devmanus fame madhuri pawar shares old shocking incident
“माझ्या खांद्यावर हात टाकला…”, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत म्हणाली…
Shivali Parab
“तेव्हा मी घाबरलेले…”, अभिनेत्री शिवाली परब प्रोस्थेटिक मेकअपचा अनुभव सांगत म्हणाली…

हेही वाचा >> सई ताम्हणकरचा बिकिनी लूकमधील फोटो व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा >> “…म्हणून स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका”, अक्षय कुमारने सांगितलं राज ठाकरे कनेक्शन

एका नेटकऱ्याने कमेंट करत “उर्फीची हवा लागली वाटतं. ही पण पिन लावून फॅशन करायला लागली”,असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “उर्फीपासून प्रेरणा घेऊन बनवलेला ड्रेस”, अशी कमेंट केली आहे. “ही तर दुसरी उर्फी जावेद आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर तिसऱ्या एका व्यक्तीने “सेफ्टी पिनचा ड्रेस”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> अमिताभ बच्चन यांच्या नातीला डेट करत असल्याच्या चर्चांवर सिद्धांत चतुर्वेदीने सोडलं मौन, म्हणाला…

जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये जान्हवीने ‘मिली नौटियाल’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. नर्सिंगचे प्रशिक्षण घेणारी मिली चुकून एका फ्रिजिंग रुममध्ये अडकते. त्या फ्रिजिंग रुममध्ये हळूहळू तापमान कमी होत जाते आणि त्याचा परिणाम मिलीच्या शरीरावर होतो. या संकटामधून बाहेर पडण्यासाठी मिलीने केलेला संघर्ष या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवीसह सनी कौशल, मनोज पाहवा आणि संजय सुरी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader