जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या फॅशन व स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असते. अशा इव्हेंट्समधील तिच्या लूकचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण, बऱ्याचदा तिला तिच्या लूकमुळे ट्रोलही केलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बदकासारख्या चालीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मलायका अरोराचं स्पष्ट उत्तर; नितंबांचा उल्लेख करत म्हणाली…

जान्हवी कपूरचा असाल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. जान्हवीने एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी ती हिरव्या रंगाचा ड्रेस घालून पोहोचली होती. तिला या हिरव्या गाऊनवरून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलंय. “तू काहीही करशील तरी नोरा फतेही नाही होऊ शकत,” असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

“सिक्रेटली सर्वच जण उर्फीपासून प्रेरणा घेतात,” असं एका युजरने म्हटलंय.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“हिची तुलना श्रीदेवींचा अभिनय किंवा स्टाइलशी होऊच शकत नाही,” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“हे लोक आरशात बघून घराबाहेर पडत नाहीत का, यांचे डिझायनर जे देतात, ते घालून घराबाहेर पडतात. यांना स्वतःची अक्कल नाही का?” असं एका युजरने म्हटलंय.

जान्हवी कपूरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

काहींनी जान्हवीला ट्रोल केलं असलं, तर काहींना मात्र तिचा लूक खूपच आवडला आहे. त्यामुळे जान्हवीचे चाहते या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत.