जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांचे नाते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या डेट नाईट्सपासून अनेक गोष्टी नेहमी चर्चेत असतात. जान्हवी कपूर अनेक मुलाखतींमध्ये तिचा प्रियकर शिखर पहारिया विषयी भरभरून बोलते. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरने ‘शिकू’ नावाचा नेकलेस परिधान केला होता. आता जान्हवीने शिखरच्या नावाचे टीशर्ट घातले असून त्यावर त्याचा फोटो असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला फोटो हा नाशिकमधील एका हॉटेलचा असून जान्हवी कपूर एका सिनेमाच्या शूटिंगसाठी येथे आली होती. तिच्या बरोबर या सिनेमात वरूण धवन सुद्धा दिसणार आहे.
हेही वाचा…जान्हवी कपूर मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडबरोबर करायची ब्रेकअप; म्हणाली, “एकदा माझं…”
सोशल मीडियावर जान्हवीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वरूण आणि ती दिसत असून यात नाशिकमधील हॉटेलचे कर्मचारी दिसत आहे. जान्हवी आणि वरुण दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या चित्रीकरणासाठी नाशिकमध्ये आले होते. मात्र, या फोटोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे जान्हवीने परिधान केलेल्या टी-शर्टने. या खास टी-शर्टवर तिच्या प्रियकर शिखर पहारिया याचे नाव आणि त्याचा फोटो प्रिंट केला होता.
हा फोटो हॉटेलच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले , “आमच्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण होता की आम्हाला बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार जान्हवी कपूर आणि वरूण धवन यांचा पाहुणचार करता आला. हा क्षण आमच्यासाठी ‘पिंच अस’ मूव्हमेंटसारखा होता.”
जान्हवीने यापूर्वीही तिचा प्रियकर शिखरसाठी तिचे प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे. यावर्षी एप्रिल (२०२४) महिन्यात तिचे वडील बोनी कपूर यांच्या ‘मैदान’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान तिने शिखरच्या नावाचा खास नेकलेस घातला होता. ‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने शिखरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, “मी १५-१६ वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझी स्वप्नं नेहमी त्याची स्वप्नं बनली आहेत, आणि त्याची स्वप्नं माझी स्वप्नं झाली आहेत. आम्ही एकमेकांचे आधारस्तंभ आहोत. जणू आम्ही एकमेकांना मोठं केलं आहे.”
हेही वाचा…सिनेमा पुन:प्रदर्शित झाल्यावर केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई
जान्हवी कपूर काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘देवरा: पार्ट १’ या चित्रपटात दिसली होती. तिचा पुढील चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान करत असून वरुण धवनही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय, ती राम चरणबरोबर ‘आरसी १६’ (RC16) या चित्रपटातही दिसणार आहे.