बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. काही व्यक्तींशी जान्हवीचं नाव जोडलं गेलं. त्यातीलच एक म्हणजे शिखर पहारिया. जान्हवी व शिखर यांचे बरेच एकत्रित फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. शिखरच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा एकत्रित व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. शिखरच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने त्याच्याबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती त्याचा हात पकडून चालताना दिसत आहे. तर जान्हवीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “याला म्हणतात संस्कार”, मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीने केलं असं काही की…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “पैसा असूनही…”

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

जान्हवी म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा शिखू”. शिखरच्या टोपण नावाने जान्हवीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय हे दोघं तिरुपती बालाजी मंदिरामध्येही गेले होते. यादरम्यानचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी, शिखरसह खुशी कपूरही दिसत आहे.
जान्हवीने यावेळी साडी परिधान केली होती. शिखरच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. या दोघांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये दोघांमधील नात्याची पुष्टी केली होती. याआधीही जान्हवी कपूर आणि शिखर मुंबईत बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते. मध्यंतरी दोघांमध्ये दुरावा आला होता. आता पुन्हा एकदा जान्हवी व शिखर एकत्र आल्याचे दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor wish her rumoured boyfriend shikhar pahariya photos and video goes viral on social media see details kmd