बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही जोड्या बऱ्याच लोकप्रिय आहेत. तसं पाहायला गेलं तर या क्षेत्रात लग्न, घटस्फोट आणि अफेअरच्या चर्चा तर नेहमीच होताना दिसतात. पण या सगळ्यात काही अशा जोड्याही आहेत ज्याची उदाहारणं परफेक्ट जोडी म्हणून दिली जातात. यापैकी एक जोडी आहे जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची. एकीकडे शबाना या उत्कृष्ट अभिनेत्री तर दुसरीकडे जावेद अख्तर हे प्रसिद्ध लेखक. जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस जाणून घेऊयात त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल…
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात १९७० मध्ये शबाना यांच्या घरापासूनच झाली होती. शबाना या प्रसिद्ध शायर कैफी आझम यांची लेक आहेत आणि जावेद अख्तर त्यांच्या घरी लेखन कला शिकण्यासाठी जात असत. जावेद अख्तर अनेकदा कैफी आझमी यांना आपल्या कविता ऐकवत असत. संध्याकाळी मैफिल जमायची ज्यात शबाना आझमीही सहभागी होत असत. अशात शबाना आणि जावेद एकमेकांना घरीच पहिल्यांदा भेटले होते आणि तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती.
जावेद अख्तर यांचं शबाना आझमींच्या घरी नेहमीच येणं-जाणं होतं. अशात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शबाना आझमी जावेद अख्तर यांच्या शायराना अंदाजावर फिदा होत्या. पण या प्रेमाला लग्नाच्या नात्यापर्यंत नेणं दोघांसाठीही फार कठीण होतं. जावेद अख्तर आधीच विवाहित होते. ज्यामुळे दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये बरेच चढ-उतार आले. जेव्हा शबाना यांचे वडील कैफी आझमी यांना या दोघांच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा ते खूप नाराज झाले. कारण जावेद फक्त विवाहितच नव्हते तर त्यांनी दोन मुलंही होती. आपल्या मुलीमुळे कोणाचा संसार मोडेल हे शबाना आझमी यांच्या आई- वडिलांना नको होतं. पण शबानाही हट्टाला पेटल्या होत्या.
आणखी वाचा- जावेद साहेबांपासून लांब रहा; बोनी कपूरची शबाना आझमींच्या पोस्टवरील कमेंट चर्चेत
जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इराणी होतं. जेव्हा हनी इराणी यांना जावेद आणि शबाना यांच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा त्यांच्या घरी रोज भांडणं सुरू झाली. जावेद आणि हनी यांची दोन मुलं होती झोया आणि फरहान अख्तर. पण जेव्हा हनी यांना कळून चुकलं की दोघांच्या नात्यात काहीच उरलं नाही आणि वाद दिवसेंदिवस वाढत जात आहेत. तेव्हा त्यांनी जावेद यांना शबाना यांच्याशी लग्न करण्याची परवानगी दिली. एवढंच नाही तर हनी यांनी जावेद अख्तर यांना लग्नाच्या ७ वर्षांनंतर घटस्फोटही दिला.
आणखी वाचा- “हे अजिबात मान्य करण्यासारखे नाही”, शबाना आझमींच्या भाचीला मुंबईत मध्यरात्री आला धक्कादायक अनुभव
जावेद अख्तर यांनी पहिली पत्नी हनी इराणी यांच्याशी असलेलं नातं तर संपवलं पण शबाना यांचे वडील कैफी आझमी मात्र या नात्याच्या विरोधातच होते. आपली मुलगी कोणाचा संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरवी हे त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी शबाना आझमी यांनी वडिलांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला की हनी आणि जावेद यांचा घटस्फोटला त्या कारणीभूत नाहीत तर जावेद-हनी यांनाच एकमेकांबरोबर राहायचं नव्हतं. त्यानंतर शबाना यांनी स्वतःपेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तर यांच्याशी १९८४ साली लग्न केलं. आज ३८ वर्षं दोघंही एकमेकांबरोबर आहेत.