ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा दिग्दर्शक व अभिनेता फरहान अख्तरच्या मुलीसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये जावेद अख्तर त्यांच्या दोन्ही पत्नी शबाना आझमी व हनी इराणी, फरहान अख्तर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अधुना आणि शिबानी दांडेकर तसेच त्याची मुलगी दिसत आहे. संपूर्ण कुटुंब फरहानची मोठी मुलगी शाक्य अख्तरच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म; फोटो पोस्ट करत म्हणाला…
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची मोठी मुलगी शाक्य अख्तर यूकेच्या लँकेस्टर विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाली आहे. लेकीचा अभिमान व्यक्त करत फरहान अख्तरने त्याच्या मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीतील काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. या फोटोत शाक्यचे आई-वडील व आजी आजोबा दिसत आहेत. तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला पूर्ण अख्तर कुटुंबाने हजेरी लावली.
फरहानच्या या पोस्टवर करिश्मा कपूर, अर्जुन रामपाल, हृतिक रोशन, जोया अख्तर, अमृता अरोरा, सुझान खान यांनी कमेंट्स करून शाक्यचे अभिनंदन केले आहे. या ग्रॅज्युएशन सेरेमनीला फरहानची बहीण जोया आणि त्याची धाकटी मुलगी अकिरा उपस्थित राहु शकले नाही.