सध्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरू आहे. ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने या महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. १६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवादरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. या महोत्सवात जावेद अख्तर यांचा सन्मान करण्यात आला.

एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या महोत्सवात सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणारे सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते ‘एशियन कल्चर’या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हेही वाचा – बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “आयुष्यात…”

पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीत लेखकांना त्यांचा योग्य तो मान व मानधन मिळणं गरजेचं असल्याचं विधान केलं. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण असून त्याला योग्य तो वाव देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवं असं मत त्यांनी मांडलं. आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. असं असताना हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली जाते. आपल्याकडे चित्रपटांमध्ये गीत- संगीताला जर महत्त्व दिलं तर आपला चित्रपट हा जागतिकदृष्ट्या नक्कीच नावाजला जाईल असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

javed akhtar
जावेद अख्तर यांना सन्मानित करतानाचा एक क्षण (फोटो – पीआर)

जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. शोले , जंजीर, दिवार यांसारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटांचे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी रसिकांना आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. गीतकार, पटकथाकार आणि कवी म्हणून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे हे २१ वर्ष असून सातत्याने सुरु असणारा हा महोत्सव २५ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करत चित्रपट रसिकांना उत्तम चित्रपट पाहण्याची संधी देत राहील असा विश्वास महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी यावेळी व्यक्त केला. २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक उत्तम जागतिक चित्रपट पाहण्याचा आनंद प्रत्येकाने जरूर घ्यावा असे सांगताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

Story img Loader