हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर जेव्हा एखाद्या शोमध्ये सहभागी होतात, तेव्हा तो शो हिट होतो असं मानलं जातं. जावेद अख्तर यांच्याकडे त्यांच्या करिअरबरोबरच खासगी जीवनाबद्दलही बोलण्यासारखं बरंच काही आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी जवळपास ५७ वर्ष काम केलंय. खासगी आयुष्यात त्यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली पत्नी हनी इराणी जिच्याबरोबर त्यांनी १९७२ मध्ये लग्न केलं होतं. तिच्यापासून त्यांना फरहान आणि झोया ही दोन मुलं आहेत. पण ६ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. अनेकदा याचं कारण अभिनेत्री शबाना आझमी असल्याचं बोललं जातं. यावर आता जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जावेद अख्तर यांनी १९८४ मध्ये अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर अरबाज खानच्या ‘इनव्हिसिबल विथ अरबाज’ या शोमध्ये त्यांनी खासगी जीवन, दोन लग्न आणि घटस्फोट या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या दोन्ही स्त्रियांशी अद्याप चांगले संबंध असल्याचंही त्यांनी या शोमध्ये सांगतिलं. एकीचं लग्नाने काही बिघडलं नाही आणि दुसरीचं घटस्फोटामुळेही काही बिघडलं नाही.

आणखी वाचा- “केवळ मजा म्हणून…” दारूच्या व्यसनाबद्दल जावेद अख्तर यांनी केला खुलासा

जावेद अख्तर म्हणाले, “पहिली पत्नी हनीबरोबर माझी मैत्री आजही कायम आहे आणि शाबाना अर्थातच माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे.” या शोमध्ये जेव्हा अरबाजने जावेद यांना वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, “जर एक जोडीदार तुमच्याबरोबर राहण्यासाठी संघर्ष करत असेल तर तो कधी खुश राहू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीचा तुमची स्वप्न आणि विचार यावर तेवढाच हक्क असतो जेवढा तुमचा स्वतःचा हक्क आहे.”

आणखी वाचा- “माझ्यासमोर एक छोटी मुलगी…” सैफने सांगितला करीनाबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “जोडीदाराच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला शंभर टक्के चुकीच्या वाटतील पण त्या तुम्हाला सहन कराव्या लागतील कारण तुम्हीही अशा बऱ्याच गोष्टी करत असता ज्या त्याला चुकीच्या वाटू शकतात.” शबाना आझमी यांच्याशी लग्नाबद्दल बोलताना ते म्हणाले, “ती एक स्वतंत्र आणि मजबूत विचारशक्ती असलेली स्त्री आहे. अशा स्त्रीबरोबर राहणं अजिबात सोपं नाही. पण अनेकदा आपण एकमेकांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देतो. ज्याने आपल्यातलं बॉन्डिंग घट्ट होतं.”

या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी पुरुषी अहंकारावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “पुरुषांच्या अंहकाराला समानतेमुळे अनेकदा धक्का लागतो. पण एका स्त्रीबरोबर राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वभावात विनम्रता आणावी लागते, तिला समजून घ्यावं लागतं आणि काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar open up about two marriages divorce and married life at arbaaz khan show mrj