Javed Akhtar : भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना दुबईत रविवारी पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र भारतीय गोलंदजांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांना ५० षटकांत २४१ धावच करता आल्या. विजयासाठी अवघ्या २४२ धावांचं लक्ष्य होतं. जे भारतीय संघाने सहा गडी राखत गाठलं. विराट कोहलीने केलेली शतकी खेळी ही महत्त्वाची ठरली. त्यामुळे विराट कोहलीचं कौतुक होतं आहे. जावेद अख्तर यांनीही विराट कोहलीचं कौतुक केलं. ज्यानंतर त्यांना एका युजरने टोमणा मारला. या टोमण्यानंतर जावेद अख्तर यांनीही त्याला तिखट प्रत्युत्तर दिलं. जाणून घेऊ नेमकं काय घडलं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जावेद अख्तर यांनी केलं विराटचं कौतुक

सामना संपल्यानंतर कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी विराट कोलहीचं कौतुक केलं. ते म्हणले, विराट कोहली जिंदाबाद, हमे आप पर गर्व है. यावर एका युजरने लिहिलं जावेद, बाबर का बाप कोहली है. बोलो जय श्रीराम. या युजरला जावेद अख्तर यांनी खडे बोल सुनावले.

जावेद अख्तर यांनी युजरला काय सुनावलं?

जावेद अख्तर रिप्लाय करत म्हणाले, “मै सिर्फ ये कहूंगा की तुम एक नीच इंसान हो और नीच ही मरोगो, तुम क्या जानो देश प्रेम क्या होता है.” यानंतर दुसऱ्या एका युजरने जावेद अख्तर यांना टॅग करत म्हटलं की आज सूर्य कुठून उगवला काय माहीत, आतून तर तुम्हाला दुःख होत असेल. त्यावर उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, “बेटा, जब तुम्हारे बाप-दादा अंग्रेजोंके जुते चाट रहे थे, तब मेरे बाप-दादा आजादी के लिए जेल और काला पानी की सजा काट रहे थे. मेरी रगोंमे देश प्रेम का खून है, और तुम्ही रगो में अंग्रेजो के नौकरो खून है. इस अंतर को भूलो नहीं.” (तुझे वडील-आजोबा जेव्हा इंग्रजांचे बूट चाटत होते तेव्हा माझे वडील-आजोबा, माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले होते आणि शिक्षा भोगत होते. माझ्या रक्तात देशप्रेम आहे, तुझ्या रक्तात इंग्रजांच्या नोकरांचं रक्त आहे. हा फरक विसरु नकोस.) असं म्हणत जावेद अख्तर यांनी युजर्सना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे.